Viral Video :- वाईटापेक्षा वाईट प्रसंगांमधून महिला नेहमीच तगडा उपाय शोधून काढतात. आणि या गोष्टींमध्ये त्यांचा हात कोणीच धरू शकत नाही. घरातील एखादी गोष्ट शोधून देण्यापासून ते अगदी मुलाबाळांसाठी हिरकणी बनण्यापर्यंत महिला कुठेच मागे पडत नाहीत आणि महिलांच्या साहसी वृत्तीसमोर भले भले नतमस्तक होतात. तर आज एका व्हायरल होणाऱ्या व्हिडीओतसुद्धा असंच काहीस बघायला मिळालं आहे. अस्वलापासून जीव वाचवता यावा यासाठी महिलांनी त्यांचं डोकं लावून हा टप्पा पार केला आहे.

तर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, रस्त्याच्या कडेला तीन महिला उभ्या असतात आणि तिथे एक अस्वल येतो. त्या तीन महिलांपैकी एका महिलेकडे हा अस्वल जातो आणि तिच्या शरीराचा वास घेत तिचा पाय खेचताना दिसतो. पण आश्चर्याची गोष्ट अशी की, हा प्रसंग घडताना ही महिला एकदम शांत आणि स्थिर उभी असते. तसेच तिच्यासोबत असणाऱ्या दोन महिलादेखील शांत आणि स्थिर राहून त्या महिलेला साथ देताना दिसत आहेत. मग काही क्षणांतच अस्वलाला जाणवते की, या महिलांकडून त्याला काहीच धोका नाही आणि म्हणूनच की काय ते अस्वल त्या महिलांना इजा न पोहोचवता, गुपचूप तिकडून निघून जातो. हे दृश्य बघताच तुमच्याही अंगावर नक्कीच काटा येईल. एकदा बघाच हा व्हिडीओ.

हेही वाचा :- पाण्याचा पंप बनवून केला जुगाड; व्हिडीओ पाहून म्हणाल कसा सुचला हा उपाय ?


नक्की बघा :-

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जंगलातले प्राणी जेव्हा कोणावर हल्ला करतात तेव्हा अनेक जण घाबरून जातात. आरडाओरडा करतात. त्याच्यावर दगडफेक करताना, प्राण्यांना इजा पोहोचवून स्वत:चा जीव वाचवण्याचा प्रयन्त करताना दिसून येतात. पण या महिलांच्या अजब युक्तीनं अस्वलालाही माघार घ्यायला भाग पाडलं आहे. हा व्हिडीओ सीसीटीव्ही इडियट्स (CCTV IDIOTS) यांच्या ट्विटरवर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून महिलांनी अस्वलाकडून सुटका करून घेण्यासाठी अजब युक्ती शोधून काढली, असं म्हणायला हरकत नाही.