Viral Video :- मैत्री ही सगळ्यांच्या आयुष्यातील एक खास नातं आहे. तुमच्या जीवनातील एखादी आनंदाची बातमी असो किंवा एखादी वाईट बातमी, तुम्ही तुमच्या आवडत्या एका मित्राला जाऊन पहिलं सांगता. कारण तुम्हाला माहीत असते की, जीवनात कोणताही वाईट प्रसंग आला, तरीही तो एक मित्र तुमची साथ कधीच सोडणार नाही. तर आज सोशल मीडियावर असंच एक मैत्रीचं उत्तम उदाहरण बघायला मिळालं आहे. ज्यात एक कासव पाण्यात उलटं होतं. आणि कासवचे मित्र या प्रसंगातून त्याची मदत करताना दिसून येतं.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, पाण्यात काही कासव पोहताना दिसत आहेत. त्यातलचं एक कासव पाण्यात पोहता पोहता उलटं होतं. आणि मूळ स्थितीत येण्यासाठी तडफडताना दिसतं. हे बघून तळ्यातील जमलेले कासव त्या कासवच्या जवळ जातात आणि जमलेल्या कासवांपैकी एक कासव, पाण्यात उलटं पडलेलं कासव पुन्हा मूळ स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहे. कासव मित्र जवळ जाऊन त्या कासवासं सरळ होण्यास मदत करतना दिसतो, आणि जोपर्यंत ते कासव सरळ होत नाही, तोपर्यंत ते कासव प्रयत्न करतच राहतं. अखेर कासव मित्राचे प्रयत्न यशस्वी होतात आणि व्हिडीओत शेवटी कासव मूळ स्थितीत आलेलं दिसून येत आहे. मैत्री फक्त माणसांचीच नाही, तर ती प्राण्यांचीही असते; असे या व्हिडीओतून आज स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा :- कारच्या सीटमध्ये बनवला स्पेशल दरवाचा, दारु तस्करीसाठीचा विचित्र जुगाड पाहून पोलिसही चक्रावले
व्हिडीओ नक्की बघा :-
जेव्हा कोणतेही संकट येतं, तेव्हा हे कासवं त्यांच्या शरीरावरील कवचामध्ये जाऊन लपतात. कवचाचा हा भाग कासवचे संरक्षण करतो. कवचाशिवाय किंवा त्याच्या शरीरातील काही भागांशिवाय कासव नीट हालचाल करू शकत नाहीत. कासवसाठी कवचाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे असते. कासवने पाठीवरील संरक्षण गमावल्याने हानीदेखील पोहचू शकते. जसे तुम्ही आता व्हिडीओत पाहिलं असेल की,संरक्षणाचा भाग पाण्यात गेल्याने ते कासव मूळ स्थितीत येण्यासाठी इतर कासवची मदत घेताना दिसून आले आहे.
सोशल मीडियावरील हा व्हिडीओ (@shouldhavanima) या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. जो मैत्रीचे एक उत्तम उदाहरण देत आहे. अनेकांना हा व्हिडीओ आवडला असून अनेकजण विविध शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त करताना कमेंटमध्ये दिसून येत आहेत.
