ताऱ्यांचे बेट… नासाने शेअर केलेले हे फोटो पाहून Speechless व्हाल

नासाने शेअर केलेल्या ताऱ्यांच्या खजिन्याचा फोटो पाहून तुमचे डोळे नक्कीच विस्फारतील. अवघ्या दहा तासांत या फोटोला आतापर्यंत ८.३ पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.

incredible-images-of-the-universe
(Photo: Instagram/nasa)

अंतराळात दररोज काहीतरी नवीन घडत असतं. या अद्भुत घटनांना अनेकदा शास्त्रज्ञ नोंद करत असतात आणि लोक अवकाशातील हे मनमोहक सौंदर्य पाहण्यासाठी उत्सुक सुद्धा असतात. अंतराळातला पुन्हा एकदा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक फोटो समोर आलाय. अंतराळात नष्ट होणारे तारे जेव्हा एकत्र येतात तेव्हा किती सुंदर दृष्य निर्माण होतं, ही प्रकिया या व्हायरल फोटोवरून लक्षात येते. नासाने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक अद्भूत सौंदर्य दाखवणारा फोटो शेअर केलाय. हा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

नासाने वर्णनात्मक कॅप्शनसह हा फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलाय. “हे तारे आपल्यासारखे (हायड्रोजन, हीलियम आणि कार्बनचे बनलेले.) आहेत.” या फोटोमध्ये वायू-धूळीच्या दाट ढगांमध्ये वसलेल्या ताऱ्यांच्या वसाहती म्हणजेच नेब्युला दिसून येत आहेत. या ढगातील धूळ, वायू खूप दूरवर पसरलेले आहेत. गुरुत्वाकर्षण ह्या सगळ्यांना जवळ जवळ आणत रहाते. ह्या वायू मध्ये मुख्यतः हायड्रोजन आणि हेलियम हे वायू असतात. जवळजवळ येऊन ह्या ढगाची व्याप्ती वाढत जाते. एक वेळ अशी येते की हा ढग आपल्याच गुरुत्वाकर्षणावर तग धरू शकत नाही. त्याच्या रेट्यापुढे तो आतल्या आत कोलमडून जातो. असं कोलमडून गेल्यामुळे ह्या ढगाच्या आत असलेलं साहित्य प्रचंड गरम होते. हा आतला तापलेला भाग म्हणजेच एका ताऱ्याची निर्मिती सुरु होते. नेब्युला अश्या ढगांची खाण आहे. ह्या खाणीतून आत्ताच्या क्षणाला सुद्धा अनेक ताऱ्यांची निर्मिती सुरु आहे.

स्पिट्झर स्पेस टेलीस्कोपने टिपलेल्या या अद्भूत फोटोमध्ये डावीकडून उजवीकडे अनुक्रमे ईगल नेबुला, ओमेगा नेबुला, ट्रायफिड नेब्युला आणि लॅगून नेब्युला दिसून येते आहेत. काळ्या बॅकग्राउंडमध्ये दिसणारे हे नेब्युला पृथ्वीपासून थोडथोडके नव्हे तर ७०० प्रकाशवर्ष दूर आहेत.

आणखी वाचा : यांचं भलतच! चक्क म्हशीच्या पाठीवर बसून उमेदवार गेला अर्ज भरायला…

 

View this post on Instagram

 

A post shared by NASA (@nasa)

आणखी वाचा : मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी दिलं जातंय कोंबडीच्या रक्ताचं इंजेक्शन

तारकासमुहातलं हे सौंदर्य लोकांना पाहता यावं यासाठी नासाने हा फोटो शेअर केलाय. हे फोटो पाहताक्षणीच अविश्वसनीय वाटत असतात. ताऱ्यांचं हे सौंदर्य पाहून प्रत्येकजण अवाक झालाय. हे फोटोज इतके आकर्षित आहेत की, तुम्ही यासाठी काही बोलू शकणार नाहीत, केवळ हे फोटोज पाहत रहाल. ताऱ्यांचा हा खजिना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला आहे.

नासाने हे फोटोज शेअर करून केवळ दहा तासांमध्येच या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. ताऱ्यांचं जणू काही मॅटर्निटी होमच असलेल्या नेब्युलाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आतापर्यंत या फोटोला ८.३ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत आणि अजुनही ही संख्या झपाट्याने वाढत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Incredible images of the universe shared by nasa will stun you prp