ओडिशाच्या पुरी समुद्रकिनाऱ्याचे अविश्वसनीय सौंदर्य टिपणाऱ्या काही व्हायरल फोटोंनी लोकांना मंत्रमुग्ध केले आहे. हे फोटो, व्हिडीओ म्हणजे अशी एक संधी आहे की जिथे निसर्गाचं आश्चर्यकारक रूप तुम्हाला बघायला मिळत आहे. तुम्हाला हे फोटो पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतील हे नक्की.आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी ट्विटरवर फोटो शेअर केले आहेत. ” चेंजिंग मूड ऑफ पुरी बीच” असं कॅप्शन देत त्यांनी फोटो ट्विट केला. निसर्गाचं आश्चर्यकारक रूप दाखवणाऱ्या या फोटोमध्ये बीच आपला मूड बदलतोय हे दिसून येत. प्रख्यात वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी मूळतः हे फोटो कॅप्चर केले आहेत आणि मायक्रो-ब्लॉगिंग साइटवर अर्थात ट्विटरवर शेअर केले होते. हेच फोटो आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनी पुन्हा ट्विट केले.

पोस्टवर एक नजर टाका तुम्हाला नक्कीच कुतूहल वाटेल

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

पोस्ट, शेअर केल्यापासून, जवळजवळ १,४०० लाईक्स आले आहेत. तर अनेकांनी विविध प्रकारच्या कमेंट्सही केल्या आहेत.”अतिशय सुरेख. मला एका प्राचीन ग्रीक नाविकांच्या म्हणण्याची आठवण करून देते: रात्री लाल आकाश हा खलाशीचा आनंद असतो आणि सकाळी लाल आकाश हा नाविकांचा ….? …. हे पूर्ण करण्यासाठी तुमच्यावर सोडत आहे. एका ट्विटर वापरकर्ता लिहतो. “सुंदर. ही सुंदरता तशीच राखली गेली पाहिजे, ”दुसरा कमेंट करत व्यक्त होतो . “सुंदर कॅप्चर ” तिसऱ्याने कमेंट केली. काही लोकांनी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी “आश्चर्यकारक” असं देखील लिहिले.

पटनायक यांनी त्यांच्या एका ट्वीटमध्ये पुरी बीचचा व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

पुरी बीचच्या फोटो आणि व्हिडीओवर तुमचे काय मत आहे?