भारत आणि पाकिस्तान यांच्यातला कोणत्याही खेळातला सामना असला, तरी त्याचा दोन्ही देशांमध्ये प्रचंड उत्साह असतो. हा सामना क्रिकेटचा असला, तर मग विचारताच सोय नाही. क्रिकेट धर्म आणि क्रिकेटर्सला देव मानणाऱ्या चाहत्यांसाठी असा सामना म्हणजे प्रचंड मोठी पर्वणीच! टी-२० वर्ल्डकपचा थरार सुरू होण्यापूर्वीपासूनच या स्पर्धेपेक्षाही भारत आणि पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधल्या सामन्याचीच जास्त उत्सुकता जगभरातल्या क्रिकेटप्रेमींमध्ये दिसून येत आहे. इंटरनेटवर तर क्रिकेट चाहत्यांच्या क्रिएटिव्हिटीला ऊत आला असून त्यासंदर्भात तुफान मीम्स आता व्हायरल होऊ लागले आहेत. काहींनी फोटो टाकले असून काहींनी टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी व्हिडीओ देखील पोस्ट केले आहेत.

नेटिझन्समध्ये या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असून ट्विटरवर याचे मीम्स सुरू झाले आहेत. काही नेटिझन्सनी दाक्षिणात्य सिनेमातील फोटोवरून मीम्स बनवले आहेत.

काहींनी करवा चौथच्या विधीवरून मीम्स बनवला आहे…

काहींनी धोनीच्या तोंडी चक दे इंडियामधला डायलॉग चिकटवला आहे!

कुणीतरी मॅच सुरू होण्यासाठी दिवस संपण्याची वाट पाहात आहे..

कुणी टीव्हीलाच फुटू नये म्हणून कैदेत ठेवलं आहे…

काहींना हेराफेरीमधल्या परेश रावल अर्थात बाबूभैय्याची आठवण झालीये!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कुणी