Viral Kid Fan Video India Pakistan Match: २८ सप्टेंबर २०२५… ही तारीख प्रत्येक भारतीय क्रिकेटप्रेमीच्या मनावर कोरली जाणार आहे. का? कारण या दिवशी भारताने पाकिस्तानला आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत केलं. आशिया चषक २०२५ चा अंतिम सामना म्हणजे क्रिकेट चाहत्यांसाठी सणासारखा ठरला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर झालेल्या या ऐतिहासिक लढतीत भारताने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव करून नवव्यांदा आशियाचा बादशहा बनण्याचा किताब पटकावला. या अविस्मरणीय विजयाने गल्लीबोळांत ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष सुरू झाला, फटाके फुटले आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण दणाणून गेलं. ज्या क्षणी भारताने सामना जिंकला, त्या क्षणी प्रत्येक चाहत्याच्या चेहऱ्यावर आनंदाचा स्फोट झाल्यासारखं वातावरण होतं.
पण, या सर्व गोंगाटात एक छोटा फॅन सोशल मीडियावर झळकला. रायपूरच्या या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून सगळ्यांना हसू आवरणे कठीण झाले होते. कारण त्याने पाकिस्तान टीमची अशी खिल्ली उडवली की… चाहत्यांनी त्यालाच ‘स्टार’ घोषित केलं. रायपूरमधील हा गोंडस मुलगा सामना संपल्यानंतर मीडियाशी बोलताना असा काही भन्नाट रिॲक्शन देऊन गेला की सोशल मीडियावर तो क्षणाक्षणाला व्हायरल होत आहे.
छोट्या फॅनचं भन्नाट वक्तव्य
जेव्हा रिपोर्टरने त्या चिमुकल्याला विचारलं की सामना जिंकल्यावर कसं वाटतंय, तेव्हा त्याने आनंदाने उड्या मारत उत्तर दिलं, “अरे पाकिस्तानला तर रोज हरायचंच असतं, नेहमी हरतं! अरे पाकिस्तान, काही तरी करून दाखव ना… थू!”
हे बोलून तो माईकपासून दूर जातो, पण एवढ्याशा वाक्यातून त्याने संपूर्ण पाकिस्तान टीमची खिल्ली उडवली. त्या छोट्या फॅनच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि त्याच्या शब्दांतला आत्मविश्वास पाहून कळतं की भारतीय चाहत्यांच्या मनात पाकिस्तानबद्दल किती नाराजी आणि तिरस्कार साठला आहे.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
हा VIDEO ANI ने एक्स (पूर्वीचं ट्विटर) प्लॅटफॉर्मवर शेअर केला आणि मग काय… चाहत्यांच्या कमेंट्सचा महापूर सुरू झाला. एका युजरने लिहिलं, “माइकला अफरीदीचं तोंड समजून थुंकलं”, दुसऱ्याने लिहिलं, “भविष्यात भारत सुरक्षित आहे, कारण असे फॅन्स आहेत!” आणखी एका युजरने चिमुकल्याच्या स्टाईलवर कमेंट केली, “अरे थू… थेट पाकिस्तानवर!” हजारो लोकांनी हसणाऱ्या इमोजीसह प्रतिक्रिया दिल्या आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर धमाल उडवू लागला.
येथे पाहा व्हिडीओ
भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये भावना नेहमीच तुफानी असतात. पण, या वेळी रायपूरच्या एका छोट्याशा चाहत्याने आपल्या दोन वाक्यांत सगळं सांगून टाकलं. पाकिस्तान नेहमी हरतो आणि भारत नेहमी जिंकतो! हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर तुफान गाजतोय आणि पुढील अनेक दिवस तो चर्चेचा विषय ठरणार यात शंका नाही.