Pune Viral Video : गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि भारतात तणावाचे वातावरण आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमध्ये घुसून 9 ठिकाणी हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून जम्मू, जैसलमेर आणि अमृतसर इत्यादी ठिकाणी ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्याचे प्रयत्न भारताने हाणून पाडले असून ड्रोन नष्ट करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्त दिले. भारत पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असल्याने संपूर्ण देशात सुरक्षा वाढवली आहे. अनेक शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आले.

पुण्यात सुद्धा अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली. अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पुण्यातील सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील दगडूशेठ मंदिराबाहेर सुरक्षा वाढवल्याचे दिसतेय. दगडूशेठ मंदिर हे पुण्यातील अतिशय लोकप्रिय ठिकाण आहे. भाविक दरवर्षी गणपतीच्या दर्शनासाठी येथे गर्दी करतात. या मंदिराला लागून पुण्यातील तुळशीबाग हा प्रसिद्ध मार्केट परिसर सुद्धा आहे. त्यामुळे या परिसरात लोकांची प्रचंड गर्दी दिसून येते. या सर्व बाबी लक्षात घेऊन येथील सुरक्षा वाढवल्याचा अंदाज आहे.

पुण्यातील दगडूशेठ मंदिराबाहेर सुरक्षा वाढवली

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दगडूशेठ मंदिराबाहेरचा परिसर दिसेल. या परिसरात मंदिराच्या अवतीभोवती सुरक्षा कर्मचारी, भारतीय जवान दिसत आहे. काही पोलीस कर्मचारी सुद्धा येथे तैनात करण्यात आले आहे. काही ठिकाणी आर्मीच्या गाड्या सुद्धा पार्क केलेल्या दिसत आहे. हा व्हिडीओ ९ मे च्या रात्रीचा असल्याचा दावा केला आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

jhakaas_pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील दगडूशेठ मंदिराबाहेर सुरक्षा वाढवली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सलाम आहे पुणे पोलीस. दगडुशेठ गणपती मंदिर सुरक्षा करत आहेत हिंदू मुस्लीम बांधव एकत्र आहे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी ७ मे रोजी पुण्यात जवळपास ७६ ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये पुण्यातील काही महत्त्वाच्या आणि संवेदनशील भागांचा समावेश होता. या ठिकाणी सायरन लावण्यात आले.