Bus Viral Video : सणासुदीच्या काळात बस आणि ट्रेनमध्ये चढायला मिळणे म्हणजे नशीब समजायचे. कारण- या काळात गाड्यांना इतकी गर्दी असते की, प्रवाशांना श्वास घेण्यासाठीही अनेकदा जागा नसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे कन्फर्म तिकीट असूनही अनेक प्रवाशांना गर्दीमुळे ट्रेनमध्ये चढता येत नाही. दरम्यान, बसमधील स्थितीही काही वेगळी नाही. सणासुदीच्या काळात अनेक प्रवासी बसच्या दारे-खिडक्यांवर चढून बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत असतात. अशाच एका बसमधील गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात एका जोडप्याने प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये चढण्यासाठी नवा जुगाड शोधला आहे. तो पाहून अनेकांनी याला हा खरा ‘कपल गोल’ आहे आणि हेच जीवनाचे सत्यदेखील, असे म्हटले आहे

बसमध्ये चढण्यासाठी जागा न मिळाल्याने एक पतीने आपल्या पत्नीला अशा पद्धतीने बसमध्ये घुसवण्यासाठी जागा करून दिली; जे पाहून अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे. पण, खेडोपाड्यांतील अनेक बस स्टॅण्डवर गर्दीच्या वेळी तुम्हाला काही वेळा असेच चित्र पाहायला मिळते.

व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक यूपी रोडवेजची बस स्टॅण्डवर उभी असल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी बसच्या दरवाजावर प्रवाशांची प्रचंड गर्दी दिसतेय. अनेक प्रवासी हात-खांद्यावर बॅग घेऊन गर्दीतही बसमध्ये शिरण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण, यावेळी एक जोडपे बसच्या मागच्या खिडकीतून आत शिरते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बाहेर उभी असलेली महिला बसच्या शेवटच्या टोकाजवळील खिडकीजवळ जाते आणि चप्पल काढून बसमध्ये आधीच उपस्थित असलेल्या व्यक्तीकडे देते. त्यानंतर बसमधील व्यक्ती महिलेचा हात पकडून तिला खिडकीतून बसमध्ये खेचते. या प्रकारे ती महिला गर्दी असूनही बसमध्ये पोहोचते.

गेटवरून बसमध्ये चढण्यात या जोडप्याला यश आले नाही, तेव्हा त्यांनी खिडकीतून बसमध्ये प्रवेश केल्याचे समजते. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ @HasnaZaruriHai या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे; ज्यावर अनेक युजर्स कमेंट करीत आहेत. एका युजरने लिहिले की, ही पद्धत योग्य नाही. दुसरा एक युजर म्हणाला की, एकापेक्षा एक आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे.