ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानात रंगलेल्या बिग बॅश लीग (BBL) सामन्यादरम्यान अचानक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणारी घटना घडली. या सामन्याच्या मध्यावर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका भारतीय चाहत्याने गुडघ्यावर बसून आपल्या प्रेयसीला प्रपोज केले; जे पाहून तिलाही धक्काच बसला. ही सुंदर घटना आता कॅमेऱ्यात कैद झाली आहे. लाइव्ह मॅचदरम्यान मुलाखतकाराने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका भारतीय तरुणाला काही प्रश्न विचारले; ज्यावर उत्तर देताना त्याने सर्वांसमोर आपल्या प्रेमाची कबुली दिली.

एकीकडे मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू होता, त्याच वेळी प्रेक्षकांमध्ये असलेल्या एका भारतीय तरुणाने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले आणि तिनेही होकार दिला.

यावेळी तरुण जागेवरून उठून आपल्या प्रेयसीच्या दिशेने जातो आणि अंगठी हातात घेत गुडघ्यावर बसून म्हणतो, “हा एक मोठा प्रसंग आहे म्हणून मला तिला अंगठी घालायची आहे.” या प्रसंगानंतर स्टेडियममधील उपस्थित प्रेक्षक आणि मुलाखत घेणारादेखील आनंदाने जोरजोरात ओरडू लागतो. त्यानंतर तरुणीनेही होकार दिल्यावर उपस्थितांनी टाळ्या वाजवून दोघांचे अभिनंदन केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ 7Cricket ने त्याच्या अधिकृत एक्स अकाउंटवर शेअर केला आहे; ज्यावर लोकांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. एका वापरकर्त्याने लिहिले, “नवीन वर्ष सुरू करण्याचा हा कोणता प्लॅन आहे. आयुष्यभर टिकणारी आठवण.” दुसरा युजर म्हणाला, “किती गोंडस!”