Indian Railways Passenger Assault Video : भारतीय रेल्वेने रोज लाखो प्रवासी करतात. पण अनेकदा प्रवाशांना वाईट अनुभव येतो. सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका भारतीय रेल्वे प्रवाशाला ट्रेनमध्ये केटररने जास्त पैसे घेतल्याची तक्रार Rail Seva या अधिकृत प्लॅटफॉर्मवर केल्याबद्दल त्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रार केल्याच्या काही तासांतच त्याला ट्रेनच्या डब्यात इतर प्रवाशांसमोर त्याला मारहाण करण्यात आली बेदम मारहाण झाली. ही केवळ मारहाणीची घटना नाही, तर प्रवाशांच्या सुरक्षेवर आणि तक्रार निवारण यंत्रणेवर मोठा सवाल उपस्थित करणारी घटना आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी रोष व्यक्त केला आहे. धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तक्रारीचं उत्तर ‘मारहाणीनं’? (Complaint led to assault?)
रेडिटच्या ‘आर/इंडियन रेल्वेज’ कम्युनिटीवर पहिल्यांदा पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडिओ एक्स आणि इंस्टाग्रामवर पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.”प्रवाशाने केटररने जास्त पैसे घेतल्याबद्दल रेलसेवेकडे तक्रार केली. रेलसेवाने तक्रार करणाऱ्या प्रवाशाचा पीएनआर आणि सीट नंबर घेते, ते आयआरसीटीसीला देते आणि ते ही माहिती कंत्राटदाराला कळवते. पण याच त्रुटीचा गैरफायदा कंत्राटदाराने घेतला अन् तक्रार केल्याबद्दल थेट प्रवाशाला मारहाण करण्यासाठी त्याचे लोक पाठवले.” असे पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते.
रेडिट पोस्टनुसार, रेल्वे सेवेकडे प्रवाशाने जास्त पैसे आकारल्याची तक्रार केल्यानंतर हा वाद झाला. तक्रारदाराचा पीएनआर आणि सीट तपशील आयआरसीटीसीला शेअर करण्यात आला होता. पण तक्रारीवर कारवाई करण्याऐवजी तक्रारदाराची माहितीआयआरसीटीसीने कंत्राटदाराला कळवली अन् त्याने थेट प्रवाशाला मारहाण करण्यासाठी माणसे पाठवल्याचे समजते आहे.
१९ सेकंदांच्या फुटेजमध्ये स्लीपर कोच दाखवण्यात आला आहे जिथे अनेक पुरुष, ज्यात काही कॅटरिंग युनिफॉर्ममधील आहेत, एका प्रवाशाला वेढून मारहाण करत आहेत. इतर प्रवासी हस्तक्षेप करताना दिसत नाही.
व्हायरल रेडिट पोस्ट येथे पहा:
व्हायरल व्हिडिओ येथे पहा:
व्हिडीओ पाहून संताप (Viral video sparks outrage)
व्हिडिओ शेअर करणाऱ्या एका एक्स वापरकर्त्याने दावा केला की ही घटना सोमनाथ जबलपूर एक्सप्रेस (ट्रेन क्रमांक ११४६३) मध्ये घडली आणि सध्याच्या तक्रार निवारण प्रणालीवर टीका केली: “ज्यांच्याविरुद्ध तक्रार आहे त्यांच्याशी प्रवाशांची माहिती शेअर करणे निरर्थक आहे. तक्रारींची पडताळणी तृतीय पक्षाकडून केली पाहिजे आणि प्रवाशांना धोका न देता थेट परतफेड प्रक्रिया केली पाहिजे.”
IRCTC वर गंभीर आरोप (Serious allegations on IRCTC)
दुसऱ्या वापरकर्त्याने एक पद्धतशीर त्रुटी दर्शविली: “तुम्ही ग्राहकांना कंत्राटदाराशी थेट व्यवहार करायला लावू शकत नाही. आयआरसीटीसी जबाबदारी टाळते तर कंत्राटदार गुंडांसारखे वागतात.”
इतर अनेकांनी असेच अनुभव सांगितले, आरोप केला की त्यांच्यावर तक्रारी मागे घेण्यासाठी किंवा समस्या सोडवण्यासाठी खोटी पुष्टी करण्यासाठी दबाव आणला गेला.
सोशल मीडियावर लोकांचं म्हणणं (Public reaction on social media)



भारतीय रेल्वेने अद्याप या प्रकरणावर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही.
भारतीय रेल्वेत प्रवाशांसाठी रेलसेवा (Rail Seva) आणि IRCTC यांच्या माध्यमातून ऑनलाईन तक्रारी नोंदवण्याची सोय उपलब्ध आहे. मात्र, या प्रकरणामुळे या यंत्रणांमध्ये पारदर्शकतेचा अभाव आणि तक्रारदाराचे गोपनीयतेचे उल्लंघन समोर आले आहे.