भारतीय लष्कर आपल्या शौर्य आणि बलिदानासाठी ओळखले जाते. कडक ऊन असो वा मुसळधार पाऊस किंवा शरीर गोठवणारी थंडी कोणत्याही ऋतूमध्ये लष्करातील जवान आपले कर्तव्य बजावण्यापासून कधीच मागे हटत नाहीत. या जवानांच्या शौर्याचे अनेक किस्से आपण आजपर्यंत पाहिले आणि ऐकले आहेत. तसेच याबाबतचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत; जे पाहताच या जवानांबद्दल आपल्या मनातील आदर वाढतोच. शिवाय आपला ऊरही अभिमानाने भरून येतो.

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यामध्ये भारतीय लष्करातील जवानांना कर्तव्य बजावताना कोणत्या परिस्थितीला सामोरे जावे लागते आणि त्यांना जेवणाच्या बाबतीत किती त्याग करावा लागतो हे पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काही जवान खूप दिवसांच्या शिळ्या भाकऱ्या खाताना दिसत आहेत; परंतु या भाकऱ्यादेखील ते आनंदाने खात आहेत. ते पाहून अनेक जण भारावून गेले आहेत; तर अनेक जण त्यांच्या या त्यागाचे कौतुक करीत आहेत.

हेही पाहा – VIDEO : विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रगती करावी म्हणून शिक्षकाचा भन्नाट जुगाड; उत्तरपत्रिकांवर गुणांनुसार चिकटवले मजेदार स्टिकर्स!

खरे तर आपण रोज ठरलेल्या वेळेत नाश्ता आणि जेवण करतो; शिवाय आपणाला ताजे जेवण हवे असते. थोडे जरी थंड किंवा शिळे अन्न असेल, तर ते खायला आपण टाळाटाळ करतो. पण, देशाच्या सीमेवर असलेले आपले जवान शिळे अन्न किती आवडीने खात आहेत याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यातील एका जवानाच्या हातातील भाकरी हाताने तोडण्याचा प्रयत्न केला, तर ती तुटत नाहीये. म्हणून तो यावेळी आपल्या सहकाऱ्याला मस्करीत भाकरी कापण्यासाठी काही मिळेल का? असे विचारताना दिसत आहे. तर यावेळी त्याचा साथीदार, “तरी रोजच्यापेक्षा आजची भाकरी मऊ आहे”, असे म्हणत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जवानांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; जो पाहून आपण त्यांच्या त्याग आणि बलिदानाचा अंदाज लावू शकतो. हा व्हायरल व्हिडीओ एक्स (ट्विटर) वर @RVCJ_FB नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे, आमच्या सैन्याला सलाम! हा व्हिडीओ आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. अनेक जण त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, “हे दृश्य पाहून माझे डोळे पाणावले.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलं, “आमची भारतीय सेना खरी हीरो आहे.”