Viral Video: प्रत्येकाचे हक्काची गाडी असावी असे स्वप्न असते. ही हक्काची गाडी मग चारचाकी असो किंवा दुचाकी, ती प्रत्येक व्यक्तीला प्रिय असते. त्यामुळे मित्राने एखादी नवीन गाडी खरेदी केली असेल तरीही त्याच्याबरोबर फोटो काढण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. तर आज भारतातील काही नागरिक युनायटेड स्टेट्समध्ये फिरायला गेले आहेत. तेथील रहिवाशांची खास दुचाकी पाहून भारतीय नागरिकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परदेशात गेल्यावर अनेकांना तेथील भाषा, राहणीमान समजून घेण्यास अडचण होते. पण, काही जण याला अपवाद असतात. ते नवीन ठिकाणी जाताना नवीन लोकांबरोबर मैत्री करतात, तेथील राहणीमानाला आपलंस करतात व तेथे रमून जातात. तर आज व्हायरल व्हिडीओत तसंच काहीसं पाहायला मिळालं आहे. अलीकडेच दोन भारतीय पर्यटक युनायटेड स्टेट्समधील बाइक रायडिंग करणाऱ्या एका ग्रुपबरोबर मैत्री करताना दिसले. तसेच या नवीन मित्रांच्या बाईकवर त्यांनी आवर्जून फोटोसुद्धा काढले आहेत.

हेही वाचा…‘दादा प्लिज मला पुन्हा बोटीत घ्या…’ रिव्हर राफ्टिंग दरम्यान महिलेला उतरवलं पाण्यात अन्… पाहा धक्कादायक VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

युनायटेड स्टेट्समधील दुचाकीस्वार त्यांच्या बाईक भारतीय पर्यटकांकडे फोटो काढण्यासाठी सोपवतात. तसेच भारतीय पर्यटकदेखील बाईकवर धैर्याने पोझ देत त्यांचा वेळ मस्त आनंदात घालवताना दिसतात; तर दुचाकीस्वार मागे उभं राहून वाट पाहताना दिसत आहेत. भारतीय पर्यटक अगदी मोकळेपणाने बोलतात आणि परदेशातील या मोटरसायकल स्वारांबरोबर मजेत फोटो काढतात. बाईकस्वारांची वागणूक उद्धट असते, परदेशात भारतीय नागरिकांना नीट वागणूक दिली जात नाही, हा समज या व्हिडीओने मोडीत काढला आहे.

हा खास क्षण बाईक चालवणाऱ्या ग्रुपमधील एका व्यक्तीनं आपल्या मोबाइलमध्ये शूट करून घेतला आहे व सोशल मीडियावर @goodnews_movement गुड न्यूज मूव्हमेंटच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी विविध शब्दांत या व्हिडीओचे कौतुक करताना दिसत आहेत. एकूणच सोशल मीडियावर हा व्हिडीओ अनेकांचे मन जिंकून घेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian tourists are seen thoroughly enjoying their time posing boldly us bikers bikes picture perfect moment viral video asp
First published on: 07-05-2024 at 11:42 IST