Man Finds Giant Snake Under his Desk: साप ही जगातील सर्वांत धोकादायक प्रजाती मानली जाते. ते इतके धोकादायक आहेत की, त्यांचे नाव ऐकताच भीती वाटते. सापाचे नाव काढताच अनेकांना घाम फुटतो. सापांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. कधी साप बाईकच्या डिकीत, कधी चाकांमध्ये, तर कधी कारच्या बोनेटमध्ये लपून बसल्याचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण, हा व्हिडीओ खूपच धडकी भरविणारा आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा साप ऑफिसमध्ये टेबलाखाली लपला आहे आणि त्याला काढण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो बघून तुम्हालाही धडकी भरेल.

सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ शेअर केले जातात. सध्या एका भल्यामोठ्या सापाच्या व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे. कुणासाठीही त्यांचं घर, ऑफिस हे सगळ्यात सुरक्षित ठिकाण असतं. पण, अनेकदा हे सुरक्षित ठिकाण धोक्यात आल्याच्या अनेक घटना समोर येत असतात. आता अशीच एक घटना समोर आली आहे. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊ…

कोलोरॅडो येथील एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरला, ज्याला मिरॅकल मॅन कॅश म्हणून ओळखले जाते, त्यानं त्याच्या ऑफिसमध्ये डेस्कखाली एक महाकाय साप लपून बसलेला व्हिडीओ नुकताच व्हायरल केला आहे. तो साप पाहून खूप घाबरला असल्याचं त्यानं सांगितलं.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, ऑफिसमध्ये डेस्कच्या खाली भलामोठा साप असल्याचं दिसत आहे. काही वेळ हा साप त्याच जागी असल्याचं दिसतं. नंतर थोड्या वेळानं हा साप भिंतीवर रेंगाळताना दिसतो आणि स्वतःहून काचेच्या दारातून बाहेर पडताना दिसतो. सुरुवातीला कॅशला वाटले की तो रॅटल स्नेक असू शकतो; परंतु कमेंट सेक्शनमधील वापरकर्त्यांनी त्याला सांगितलं की तो एक बुल स्नेक आहे, जो सामान्यतः कोलोरॅडोमध्ये आढळतो आणि तो हानिकारक नाही. तो म्हणाला, “अरे देवा, मी एका प्रोजेक्टवर काम करीत होतो आणि हा साप दारातून आत घुसला आणि मला खूप घाबरवलं.” व्हिडीओवर इन्स्टाग्रामवर कॅप्शन देण्यात आलं होतं, “अरे देवा, मला आताच हृदयविकाराचा झटका येणार आहे. हे बघ. मी त्याला इथून कसे बाहेर काढू?”

FOX31 नुसार, तो साप सुमारे आठ फूट लांब होता. असं मानलं जातं की, त्यानं सुमारे दोन इंच उघड्या दरवाजातून ऑफिसमध्ये प्रवेश केला होता. गोफर स्नेक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुल स्नेकची वैशिष्ट्ये वेगळी असतात. कोलोरॅडो पार्क्स अँड वाइल्ड लाइफनुसार, ते सहसा पिवळे किंवा क्रीम रंगाचे असतात आणि त्यांच्या पाठीवर अनेक काळे डाग असतात.

येथे पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by Miracle Man (@miraclemancash)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांना मोठी धडकी भरली असून, व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रियाही केलेल्या आहेत. व्हायरल व्हिडीओवर टिप्पणी करताना एका वापरकर्त्याने लिहिलं, “सापाला सुरक्षित ठेवल्याबद्दल धन्यवाद!” दुसऱ्याने टिप्पणी दिली, “त्याला न मारल्याबद्दल धन्यवाद! मी ते माझ्या मुलांना दाखवले… छान! तो फक्त बाहेर फिरायला गेला होता.” तिसऱ्यानं म्हटलं, “सुंदर बुल साप!! तो तुम्हाला इजा करणार नाही”, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.