International Women’s Day 2025: महिला वर्ग म्हणजे सतत काही ना काही कामात व्यस्त असणारा वर्ग. घरातली कामं तर संपता संपत नाहीत. त्यात सणवार, पाहुणेरावळे, आजारपणं असं सगळं करताना आपली अगदी दमछाक होऊन जाते. यात ऑफीसचे टार्गेट्स, डेडलाईन्स असतातच. घर, ऑफीस सगळं सांभाळता सांभाळता आपण रोजच्या धबडग्यात पार अडकून जातो. घरातील प्रत्येकासाठी आपण सतत काही ना काही करत राहतो. हे सगळं करता करता आपण स्वत:ला प्राधान्य द्यायलाच विसरतो. आपल्याला आपल्यासाठी असा काही वेळ दिवसभरात मिळायला हवा असंही आपल्याला बरेचदा वाटून जातं. पण तो काढणं शक्य होतंच असं नाही. महिला दिन म्हणून या दिवशी आपला खास सन्मान केला जातो. पण आपण खरंच स्वत:कडे इतकं लक्ष देतो का? चला तर मग महिला दिनाच्या खास दिवशी संकल्प करुया. आतापासून स्वत:कडे दुर्लक्ष न करता स्वत:चीही तितकीच काळजी घेऊया.

दरम्यान मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेची काळजी न घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे भविष्यात गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे आरोग्यदायी जीवनशैली आणि आहार याच्या व्यतिरिक्‍त इतर काही गोष्टींची काळजी घेणे जरूरीचे असते.

सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्स नियमितपणे बदलणे

मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड किंवा टॅम्पन्स नियमितपणे बदलले पाहिजेत. पॅड किंवा टॅम्पन्स दर ४ ते ६ तासांनी बदलले पाहिजेत. याऊलट जर तु्म्ही तेच पॅड तासनतास बदलले नाही तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढू शकतात आणि संसर्गाचा धोका वाढतो. जेव्हाही तुम्ही बाहेर जाल तेव्हा तुमच्या हँडबॅगमध्ये एक्स्ट्रा सॅनिटरी पॅड ठेवा.

सॅनिटरी पॅड फेकताना या गोष्टी लक्षात ठेवा

सॅनिटरी पॅड फेकून देताना ते टॉयलेट पेपर किंवा रॅपरमध्ये गुंडाळा आणि वेगळ्या डस्टबिनमध्ये ठेवा. बाथरूममध्ये सॅनिटरी पॅड कधीही फ्लश करू नका. कारण ते पाईपमध्ये अडकू शकते. त्यामुळे पर्यावरणात प्रदूषण वाढू शकते.

स्वतःच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या

मासिक पाळी दरम्यान स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. आपल्या टॉयलेटची जागा कोमट पाणी आणि साबणाने कमीतकमी दोनदा स्वच्छ करा. दररोज आंघोळीबरोबर आतील कपडे बदला. बॅक्टेरिया टाळण्यासाठी सुती कपडे वापरा.

हायड्रेटेड राहा आणि पौष्टिक अन्न खा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मासिक पाळी दरम्यान भरपूर पाणी प्यावे. हे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड ठेवेल. या सर्व व्यतिरिक्त भरपूर फळे आणि भाज्या खा. मासिक पाळी दरम्यान योग्य आहाराचे पालन केले पाहिजे. कॅफिन आणि खारट पदार्थ खाणे टाळा. कारण मासिक पाळीत असे खाल्ल्याने सूज आणि अस्वस्थता वाढू शकते.