Apple कंपनीने आपली बहुप्रतीक्षित अशी आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. iPhone १५ ची लोकांमध्ये खूप क्रेझ असल्याचं दिसत आहे. जेव्हापासून आयफोन १५ सिरीजच्या विक्रीला सुरूवात झाली आहे, तेव्हापासून लोकं तो खरेदी करण्यासाठी दुकानांसमोर लांबच लांब रांगा लावत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता दिल्लीत चक्क आयफोनची डिलिव्हरी उशीरा केल्यामुळे काही ग्राहकांनी दुकानदाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

व्हिडिओ व्हायरल –

दिल्लीच्या कमलानगरमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही ग्राहक दुकानदाराला मारहाण करताना दिसत आहेत. iPhone १५ च्या डिलिव्हरीला उशीर झाल्यामुळे ग्राहक आणि दुकानदार यांच्यात वाद झाला आणि नंतर वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. या बाबतचे वृत्त एएनआयने दिलं आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये फोनची डिलिव्हरी उशीरा झाल्यामुळे ग्राहक संतापतात आणि दुकानदारासह कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करायला सुरुवात करतात. या हाणामारीत दुकानातील काही कर्मचाऱ्यांचे कपडे फाटल्याचंही व्हिडीओत दिसत आहे.

हेही पाहा – Viral Video : मेट्रो ट्रेनमध्ये बॅक फ्लिप मारायला गेला अन् जन्माची अद्दल घडली, प्रवासी आयुष्यभर विसरणार नाही

पाहा व्हिडीओ –

ग्राहक आणि दुकानदाराच्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ग्राहकांवर कारवाई केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. काही लोक याला आयफोनसाठी लोक वेडे होत असल्याचं म्हटलं आहे. तसेच अशा ग्राहकांवर कारवाई करण्याची मागणी देखील अनेकजण करत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका युजरने लिहिलं, “आजकाल आयफोनच्या क्रेझने माणुसकी हिरावून घेतली आहे. लोक फोनसाठी वेडे होत आहेत आणि माणुसकी गमावत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.” तर दुसऱ्या एकाने लिहिलं, “कदाचित त्याने आयफोन घेण्यासाठी आपली किडनी विकली असेल, त्याला नक्कीच राग येईल.” तिसऱ्याने लिहिलं, “आता तो तुरुंगात जाऊन आयफोनचा वापर करेल.”