आज एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्सचा आयपीएल २०२३ चा फायनल सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. या फायनल सामन्यापूर्वी धोनीच्या फॅन्सनी व्हिडीओद्वारे त्याच्यासाठी खास मेसेज पाठवले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हिडीओ व्हायरल

आयपीएलच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर धोनीच्या फॅन्सनी धोनीविषयी प्रेम व्यक्त केले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावुक व्हाल.

हेही वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर

या व्हिडीओत धोनीचा एक फॅन म्हणतो, “असं म्हणतात की ही धोनीची शेवटची आयपीएल स्पर्धा आहे. मला माहिती नाही हे खरं आहे की खोटं पण धोनीसारखा खेळाडू भविष्यात कधीच पाहायला मिळणार नाही.”
दुसरा एक फॅन म्हणतो की धोनी खूप शांत आणि कूल आहे. आणखी एक फॅन सांगतो की धोनी लहानपणापासून माझे प्रेरणास्थान आहे. अशा अनेक फॅन्सनी या व्हिडीओमध्ये धोनीविषयी भरभरून सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोनीचे देशभरात आणि जगभरात लाखो चाहते आहे. अनेक जण तर धोनीमुळे आयपीएल बघतात. धोनीला प्रेरणास्थान मानतात. या फॅन्सचं धोनीसोबत भावनिक नातं आहे आणि हे लोक धोनीविषयीचं प्रेम सोशल मीडियावर वेळोवेळी व्यक्त करत असतात.