Anand Mahindra Reaction viral on MS Dhoni three sixes : देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे मालक आनंद महिंद्रा हे धोनीचे चाहते आहेत यात शंका नाही. जेव्हा जेव्हा माही क्रिकेटच्या मैदानावर करिष्मा करतो, तेव्हा आनंद महिंद्रा नक्कीच त्यावर प्रतिक्रिया देतात. आता मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात माहीने लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले, ज्यावर आता आनंद महिंद्रा यांनी धोनीचे तोंडभरून कौतुक केले आहे. पण, त्यांचे धोनीचे कौतुक करण्याची अनोख पद्धत आता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.

धोनीने अवघ्या ४ चेंडूत २० धावा करत संघाला २०६ धावांपर्यंत नेले. सीएसकेच्या धावांचा हा डोंगर पार करणे मुंबई इंडियन्स संघाला मात्र जड गेले. यामुळे सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला घरच्या मैदानावरच दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर आनंद महिंद्रा यांनी एक्सवर धोनीबद्दल एक पोस्ट केली, ज्यात त्यांनी लिहिले की, आज मी कृतज्ञ आहे की माझे नाव ‘माही-इंद्रा’ आहे.

आनंद महिंद्रा यांनी पुढे लिहिले की, या खेळाडूपेक्षा सर्वात जास्त यशस्वी ठरलेला एक खेळाडू मला दाखवा… अनेक अपेक्षा आणि दबावाखालीही हा खेळू शकतो… हे त्याचा उत्साह वाढवणारे ठरते असे दिसते.

हेही वाचा – नग्नावस्थेत महिलेचा विमानतळावर धिंगाणा! नशेत तिच्याकडून शरीरसंबंधाची मागणी; VIDEO व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धोनी वयाच्या 42 व्या वर्षी ज्या प्रकारे आपल्या खेळाने चाहत्यांची मने जिंकत आहे ते विलक्षण आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही धोनीने तोच करिश्मा दाखवला, ज्याची चाहत्यांना प्रत्येक वेळी अपेक्षा असते. शेवटच्या षटकात धोनी फलंदाजीला आला. धोनीने हार्दिकच्या सलग तीन चेंडूंवर षटकार ठोकला आणि चौथ्या चेंडूवर २ धावा घेतल्या. म्हणजेच माहीने एकूण ४ चेंडूत२० धावा केल्या. केवळ धोनीच्या खेळीच्या जोरावर सीएसके संघ २२६ धावा करण्यात यशस्वी ठरला.