Fact Check : पिकांच्या किमान आधारभूत किंमतीच्या कायदेशीर हमीच्या मुद्यावर चौथ्या फेरीत केंद्र सरकारने आणखी चार पिकांना एमएसपी देण्याचे मान्य केले. सरकारच्या या प्रस्तावावर शेतकरी नेत्यांनी सर्व शेतकरी संघटनांशी चर्चा करून याबाबत अंतिम निर्णय कळवू असे सांगितले त्यानंतर अन्य संघटनांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी मोदी सरकारचा हा प्रस्ताव फेटाळला. यानंतर शेतकरी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी दिल्ली चलो चा नारा देत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. याचदरम्यान एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शेतकरी आंदोलनासाठी मॉडिफाइड ट्रॅक्टर तयार करत असल्याचा दावा केला आहे. खरंच शेतकरी आंदोलनासाठी मॉडिफाइड ट्रॅक्टर तयार केला आहे का? आज आपण त्याविषयीच जाणून घेणार आहोत.
व्हायरल व्हिडीओ
एक्सवर अनेक लोकांना एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून एक मॉडिफाइड ट्रॅक्टर तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “शेतकरी आंदोलनाची तयारी आहे का…? ही युद्धासाठी तयारी आहे आणि या सगळ्या महागड्या पॅरापेटसाठी कोण पैसे देत आहे.शेतकरी नव्हे तर खलिस्तानी पुन्हा युद्ध करण्यास उतरले आहे.”
लाइटहाऊस जर्नलिझमला एका ट्रॅक्टरचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे आढळले. शेतकरी आंदोलनासाठी खास ट्रॅक्टर तयार करण्यात आल्याचा दावा व्हिडिओमध्ये केला जात आहे मात्र, तपासाअंती ट्रॅक्टरचा व्हिडीओ भारतातील नसून हा व्हिडीओ तुर्किस्तानमधील असल्याचे तपासात समोर आले.
तपास :
InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि त्याद्वारे मिळवलेल्या किफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करून पोस्टबद्दल तपास केला रिव्हर्स इमेज सर्च झाल्यावर X यूजर सिद्धार्थचे एक ट्विट आढळले, ज्याने व्हिडिओ तुर्कीचा असल्याचे सांगणारा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
स्क्रीनशॉट ortakoy_haberim या इंस्टाग्राम प्रोफाइलवरील होता.ती प्रोफाइल तपासली. व्हायरल व्हिडिओ या प्रोफाइलवर 1 फेब्रुवारी 2024 रोजी प्रकाशित झाला होता.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते, ‘Duplex Cabin Tractor’. आम्हाला इंस्टाग्राम प्रोफाइलवर ‘cengizler_tarim_55’ हा व्हिडिओ देखील सापडला.
येथे व्हिडिओ 31 जानेवारी 2024 रोजी पोस्ट करण्यात आला होता. युजर लिहिले, ‘हा खरा व्हिडिओ आहे आणि तो त्याने रेकॉर्ड केला आहे. या ट्रॅक्टरवर ‘HATTAT 260G’ असे लिहिले होते. आम्हाला त्याच ट्रॅक्टर कंपनीचा व्हिडीओ इंटरनेटवर सापडला. हे तुर्की निर्मित ट्रॅक्टर आहे.
निष्कर्ष:
भारतात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासाठी खास ट्रॅक्टर तयार करण्यात आल्याचा दावा खोटा आहे. हा व्हिडीओ तुर्किस्तानचा आहे.