आपलं लग्न इतरांपेक्षा हटके झालं पाहिजे, असे प्रत्येक नवरा-नवरीला वाटत असते. यासाठी तेच काय, घरातील इतर मंडळीदेखील नवनवीन आयडिया शोधून काढतात. कुठे बैलावरूनच वरात काय, तर कुठे हटके डान्सच काय…, अशा अनेक हटके आयडिया वापरल्या जातात. अगदी नवरा-नवरीची वरात घेऊन जाणारी कारसुद्धा काही वेळा अगदी वेगळ्या आणि सुंदर पद्धतीने सजवली जाते. वरात घेऊन जाणारी कार ही आत्तापर्यंत आपण विविध रंगीबेरंगी फुला-पानांनी सजवलेली पाहिली असेल. पण, एका पठ्ठ्याने त्याच्याही पुढे जाऊन वरातीची कार चक्क वेफर्स, कुरकुऱ्यांच्या पॅकेट्सनी सजवली. ही सजलेली कार पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, नवरदेव नक्की लग्नासाठी निघालाय की दुकानातलं सामान विकायला? सध्या या हटके कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

अशी कार कोण सजवतं भाई?

विवाहसोहळ्यांमध्ये तुम्ही आत्तापर्यंत नवऱ्याची कार अतिशय उत्तम प्रकारे सजवलेली पाहिली असेल. काही फुलांनी सजावट करतात, तर काही वेगळ्या पद्धतींचा वापर करतात. कुरकरे, वेफर्स आणि इतर स्नॅक्स पॅकेट्सनी सजलेली कार तुम्ही कधी पाहिली आहे का? नाही, हा व्हिडीओ एकदा पाहाचं. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक सजवलेली कार दिसत आहे, पण त्यावरील सजावट साधीसुधी नाही. ही कार चक्क विविध प्रकारे वेफर्स, लेस, कुरकुऱ्यांच्या पॅकेट्सनी सजवली आहे. ही कार समोरून, मागून फक्त आणि फक्त चिप्स, कुरकुरेंच्या पॅक्टेसनी सजवण्यात आली आहे; जी पाहिल्यानंतर अनेकांना हसू आवरणे कठीण झाले आहे.

महागड्या रेस्टॉरंटमधून १०० दिवस केली जेवणाची मोफत ऑर्डर; Photo शेअर करीत सांगितली फुकटात खाण्याची ट्रिक

हा व्हिडीओ @desimojito नावाच्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) पेजवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘वराने चकणा बरोबर आणला आहे.` व्हिडीओ पाहिल्यानंतर एका युजरने लिहिले, या जगात किती उदाहरणे आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले – जेव्हा तुम्ही किराणा दुकानाच्या मालकाशी लग्न करता. दरम्यान, अनेक युजर्सनी या अतरंगी पद्धतीवर भरभरून कमेंट्स केल्या आहेत.