अंकिता देशकर

Israel PM Netyanahu Sends Son In War: इस्त्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन वादात अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला सुद्धा असाच एक फोटो ऑनलाईन चर्चेत असल्याचे आढळून आले. यात असा दावा केला जात आहे की इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू त्यांच्या धाकट्या मुलाला युद्धात देशसेवा देण्यासाठी पाठवत आहेत. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी फोटोची तुलना भारतीय राजकारण्यांशी करत आमच्याकडच्या नेत्यांची मुलं सैन्यात का भरती होत नाहीत असे विचारात टोमणे सुद्धा मारले आहेत.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Megh Updates ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हायरल फोटो शेअर करत आहेत.

https://x.com/Vijay_Gautamm/status/1712006647231685080?s=20
https://x.com/LawrenceOkoroPG/status/1712057956613644362?s=20
https://x.com/swet2me/status/1712055260921872573?s=20

तपास:

आम्ही व्हायरल चित्राला गूगल रिव्हर्स इमेज वापरून शोधले, आम्हाला हे चित्र एका इस्रायली वेबसाईटवर एका आर्टिकल मध्ये अपलोड केलेले सापडले.

https://www.7kanal.co.il/news/173753

पंतप्रधानांचा धाकटा मुलगा अवनर नेतन्याहू लष्करी सरावात किंचित जखमी झाल्याचे रिपोर्ट मध्ये नमूद करण्यात आले आहे. आर्टिकल ३० डिसेंबर २०१४ रोजी अपलोड करण्यात आले होते.

आम्हाला हा व्हायरल फोटो ४ डिसेंबर २०१७ रोजी पोस्ट केलेल्या friendsoflibi.org वरील लेखात देखील दिसून आला. लेखात नमूद केले आहे की नेत्यानाहू यांच्या लेकाने सैन्यात सेवा पूर्ण केली आहे.

https://friendsoflibi.org/israeli-prime-ministers-son-avner-netanyahu-completes-army-service/

आम्ही इंटरनेटवर अवनेर नेतन्याहू याबद्दल शोधले. नेतान्याहूच्या मुलांबद्दलच्या लेखात नमूद केले आहे की अवनर, सर्वात धाकटा मुलगा कॉम्प्युटर सायनटिस्ट आहे.

https://coopwb.in/info/benjamin-netanyahu-children/

सध्या सुरु असलेल्या इस्रायल गाझा युद्धादरम्यान अवनेर सेवा देणार असल्याबद्दल आम्हाला कोणतेही वृत्त आढळले नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: नेतन्याहू यांच्या मुलाचे जुने फोटो व्हायरल झाले आहेत आणि दावा केला जात आहे की इस्राएलचे पंतप्रधान आता त्यांच्या मुलाला युद्धात सहभागी होण्यासाठी पाठवत आहे. मात्र हा फोटो जुना असून, सध्या व्हायरल होणारा दावा खोटा आहे.