आमिर खान स्टारर लाल सिंग चड्ढा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अभिनेता नागा चैतन्य तेलगू चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध नाव आहे. ज्याने ‘प्रेमम’, ‘100% लव्ह’ आणि ‘ये माया चेसावे’सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले, या वर्षाखेरीस त्याचा आगामी ‘थंडेल’ चित्रपट रिलीज होणार आहे. नागा चैतन्यने नुकतीच ‘लॅक्मे फॅशन वीक X FDCI’ ला हजेरी लावली होती, यावेळी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्याने आत्तापर्यंतचा त्याचा प्रवास आणि एक अभिनेता म्हणून प्रवास करताना त्याच्या आयुष्यात आलेले चढ-उतार, त्याचे आवडते पदार्थ आणि फॅशनबाबत भरभरुन सांगितले.

१) इंडस्ट्रीत जवळपास १५ वर्ष काम केल्यानंतर तू या प्रवासाकडे कशापद्धतीने पाहतोस?

  • माझा इंडस्ट्रीमधील प्रवास खूप समाधानकारक आहे, पण अजून बरेच काही करायचे आहे. या १५ वर्षांत खूप काही शिकायला मिळाले. म्हणून, मी अजून चांगल्याप्रकारे शिकण्यासाठी प्रयत्न करतोय. पण एका शब्दात सांगायचे झाले तर मी म्हणेन, खूप समाधानकारक.

२) एक अभिनेता होताना तुझ्या मते सर्वात आव्हानात्मक आणि रोमांचक गोष्ट कोणती आहे?

  • मी म्हणेन की, अभिनेता होणे हीच सर्वात मजेदार आणि रोमांचक गोष्ट कारण मला दर सहा महिन्यांनी वेगळी भूमिका करायला मिळते. सर्वात आव्हानात्मक गोष्ट सांगायची तर, आपल्याला शिकत राहावे लागते आणि आपल्या कामात नेहमीच अव्वल रहावे लागते कारण आपल्या आजूबाजूला खूप स्पर्धात्मक वातावरण असते. पण एक प्रकारे, ही स्पर्धाच मला अधिक चांगले करत राहण्यास प्रवृत्त करते.

३) एक अभिनेता म्हणून तू फिट राहताना फिटनेस आणि आहार यात कशाप्रकारे समतोल साधतोस?

  • फिट राहणं हा माझ्या करियरचा भाग असला तरी मला वैयक्तिकरित्या व्यामाय करुन खूप आनंद मिळतो, यामुळे मी मानसिकदृष्ट्या फिट राहतो आणि मला नेहमी आनंदी राहण्यास मदत होते. रोज निरोगी आहार खाणे, दररोज एक तास (किंवा त्यापेक्षा जास्त) व्यायाम करणे आणि पुरेशी विश्रांती घेणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. माझ्या मते विश्रांती घेणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हाच दृष्टीकोन मला निरोगी ठेवतो आणि मी पुढे जात राहतो.

४) तुझा सर्वात आवडीचा पदार्थ कोणता?

  • मला आईस्क्रीम खूप आवडते, विशेषतः मॅग्नम आईस्क्रीम. ती चवीला तितकीच स्वादिष्ट असते. त्यामुळे फिटनेसबाबत मी कितीही जागरुक असलो तरी मॅग्नम आईस्क्रीम खाण्यात मला खूप आनंद मिळतो.

५) सोशल मीडिया तुमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे?

  • सोशल मीडिया खूप महत्वाचे आहे. पण जेव्हा गरज नसते तेव्हा त्यापासून दूर राहणे देखील तितकेच आवश्यक आहे. योग्य संतुलन शोधणे महत्वाचे आहे. अर्थात सोशल मीडियात खूप मोठी ताकद आहे; हे एक उत्तम साधन आहे जिथे तुम्ही फक्त लहान मजकूर किंवा फोटोतून अधिक लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकतो. पण त्यात जास्त बुडून न जाणे देखील महत्त्वाचे आहे – काय आत्मसात करायचे आणि काय मागे सोडायचे हे समजून घेणे फार महत्वाचे आहे.

६) तुझ्या अर्थी फॅशन म्हणजे काय?

  • तुम्ही जे काही परिधान करता त्यामध्ये फक्त आरामदायी फिल करा. तुम्ही कपडे घातले की त्यानंतर स्वत:ला आरशात पाहा आणि स्वत:बद्दल आत्मविशास व्यक्त करा, हाच माझा फॅशन फॉर्म्युला आहे.

७) २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पुन्हा नागा चैतन्यचा अभिनय पाहायला मिळणार का?

  • सध्या मी ‘थंडेल’ नावाचा एक तेलगू चित्रपट करत आहे जो या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होणार आहे. २०२४ मधील बॉलीवूड चित्रपट…जास्त काही सांगता येणार नाही पण तुम्ही पाह राहा.
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its important to not get to immersed naga chaitanya on dealing perils of social media sjr
First published on: 19-03-2024 at 16:50 IST