फूड आणि क्विक कॉमर्स डिलिवरी प्लॅटफॉर्म स्विगीच्या IPO चे आज शेअर बाजारात पदार्पण झाले. दरम्यान लोकप्रिय अन्न वितरण (food delivery) आणि रेस्टॉरंट एग्रीगेटर असलेल्या Zomato ने त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचे शेअर मार्केटमध्ये हार्दिक स्वागत केले.

कंपनीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Instagram वर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये Zomato आणि Swiggy चे प्रतिनिधित्व करणाऱ्या (कपंनीचे लोगो असलेले टी शर्ट परिधान केलेल) दोन व्यक्ती बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीसमोर शेजारी-शेजारी उभे आहेत. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर ” नाऊ लिस्टेड- स्विगी” असे लिहिलेले दिसत आहे. आघाडीच्या फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्ममधील या मैत्रीपूर्ण पोस्टने सोशल मीडियावर अनेकांची मने जिंकली आहेत. झोमॅटोने आपल्या खिलाडु वृत्ती दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०२४ मध्ये, कंपनीने सार्वजनिक झाल्यावर एकजुटीचा समान संदेश देणारी पोस्ट शेअर केली होती.

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
PM Narendra Modi on Sabarmati Report movie
पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘द साबरमती रिपोर्ट’ चित्रपटावर मोठी प्रतिक्रिया; पोस्ट करत म्हणाले, “बनावट कथानक…”
Shiva
Video: आशू आणि शिवाच्या आयुष्यात दिव्यामुळे नवीन विघ्न? प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी केली विनंती, म्हणाले, “कृपया आता काही…”
The unique friendship of a leopard and a deer
“अशी मैत्री कधी पाहिली नसेल…” बिबट्या आणि हरणाची अनोखी मैत्री; VIDEO पाहून व्हाल थक्क
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”
Mike Tyson, YouTube Influencer, Netflix, Mike Tyson news, Mike Tyson latest news,
विश्लेषण : माजी जगज्जेता माइक टायसन यू-ट्यूब इन्फ्लुएन्सरकरडून पराभूत! लढत खरी होती की लुटुपुटूची? फायदा नेटफ्लिक्सचाच?

येथे पाहा पोस्ट

“तु आणि मी… या सुंदर जगात” असे कॅप्शन दिलेली हा फोटो दोन कंपन्यांच्या संबंधावर प्रकाश टाकते आहे. या पोस्टला आतापर्यंत जवळपास एक लाख लाईक्स मिळाले आहेत. स्विगी आणि इतर इंस्टाग्राम वापरकर्त्यांनी पोस्टवर कशी प्रतिक्रिया दिली ते जाणून घ्या

झोमॅटोच्या पोस्टला प्रतिसाद देताना स्विगीने लिहिले: “हे जय आणि वीरू आहेत ”

हेही वाचा –रिलच्या नादात महिलेच्या पदराला लागली आग, जळता पदर घेऊन धावत सुटली, Video Viral

How Swiggy and other Instagram users reacted to the post

स्विगी व्यतिरिक्त, इतर अनेक ब्रँडने पोस्टवर कमेंट करत प्रतिक्रिया व्यक्त केली.

फिनटेक प्लॅटफॉर्म पेटीएमने लिहिले: “अरे वाह, चला पटकन केक ऑर्डर करा, पैसे तुझा भाऊ देईल. #PaytmKaro”


हेही वाचा –झोमॅटोच्या फूड रेस्क्यूबाबत ग्राहकाने मांडले मत, सीईओ गोयल यांनी दिली थेट नोकरीची ऑफर, पोस्ट चर्चेत

How Swiggy and other Instagram users reacted to the post

कोका कोलाने लिहिले: “सर्वात महान मैत्रींपैकी एक”

How Swiggy and other Instagram users reacted to the post

नेटफ्लिक्सने लिहिले की, “हे प्रेम मैत्री आहे”

अॅमेझोन प्राइमने लिहिले की, “आज दोन मित्र एका कपात चहा पिणार”

How Swiggy and other Instagram users reacted to the post


देशांतर्गत ऑडिओ ब्रँड बोल्ट ऑडिओने लिहिले, “आजची पार्टी यांच्याकडून”

सॉफ्ट ड्रिंकच्या ब्रँड स्प्राईटने लिहिले आहे “ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे(ही दोस्ती तुटायची नाय)”

हेही वाचा –“बड़ी मुश्किल बाबा, बड़ी मुश्किल” गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स, थेट माधुरी दीक्षितला दिली टक्कर, Viral Video एकदा बघाच

How Swiggy and other Instagram users reacted to the post

एचडीएफसी बँकने कमेंट करत लिहिले: “ सर्वत्र मैत्रीपूर्ण वातावरण आहे! अभिनंदन, @swiggyindia ”

How Swiggy and other Instagram users reacted to the post

शादी डॉट कॉम आणि भारत मॅट्रिमोनिअल सारख्या वैवाहिक प्लॅटफॉर्मने देखील कमेंट केली. शार्क टँक जज आणि Shaadi.com च्या मालक असलेले अनुपम मित्तल यांनी लिहिले की: “या जोडीला कोणाची नजर नको लागायला”

तर भारत मॅट्रिमोनिने लिहिले: “भारताचे नवे कपल गोल( couple goals)”

हेही वाचा –“हा गोंडस आवाज तिचा नाही”? ‘ये रातें, ये मोसम’ गाणे गाणाऱ्या चिमुकलीचा Viral Video पाहून नेटकऱ्यांचा दावा, काय आहे सत्य?

How Swiggy and other Instagram users reacted to the post

दरम्यान, “firstcravingfood” नावाच्या एका क्लाउड किचन अकाउंटने स्विगीवर टीका केली की, “@swiggyindia प्रिय स्विगी टीम,
तुम्ही प्रदान केलेल्या प्लॅटफॉर्मची मी प्रशंसा करतो, परंतु मी Zomato च्या तुलनेत काही आव्हाने पाहिली आहेत. Zomato जाहिराती चालवण्यासाठी आमच्यावर दबाव आणत नसताना, परिणामांची खात्री नसतानाही, Swiggy चे व्यवस्थापन अनेकदा असे करते. माझा विश्वास आहे की, ऑर्डरची सुसंगतता सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे, अधिक लवचिक जाहिरात पर्याय ऑफर करणे आणि रेस्टॉरंट मालकांना अधिक समर्थन देण्यासाठी तुमच्या टीमला प्रशिक्षण दिल्याने मोठा फरक पडू शकतो.”