“अतिथी देवो भव” हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. इथे परदेशी पाहुण्यांना देवा समान मानले जाते. मात्र भारतात असे काही लोक आहेत जे परदेशी पर्यटकांबरोबर चुकीच्या पद्धतीने वागताना दिसतात.त्यांच्यामुळे संपूर्ण देशाची लाज जाते. राजस्थानच्या जयपूरमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. जिथे एका व्यक्ती परदेशी पर्यटकांविषयी हिंदीमध्ये अपमानस्पद गोष्टी बोलत होता. इतकेच नाही तर त्याचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र या व्हिडीओवर आता नेटीझन्सनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तीला अटक करण्याची मागणी केली आहे.

इंस्टाग्रामवर @guru__brand0000 नावाच्या अकाउंटवरुन अशाच प्रकारचे काही व्हिडिओ शेअर करण्यात आले आहे, जे पाहून अनेकांनी या व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे, या व्हिडिओंमध्ये ती व्यक्ती महिला पर्यटकांविषयी अपमानास्पद गोष्टी बोलत आहे. यातील एका व्हिडीओमध्ये तर ती सर्व विदेशी महिलांची हिंदीत किंमत सांगत आहेत, पण हिंदीत बोलत असल्यामुळे पर्यटकांना काहीच समजत नाही.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Mark Rutte bicycle video
ना जाहिरातबाजी, ना सोहळा… ‘या’ देशाचे पंतप्रधान राजीनामा देऊन सायकलवर बसून घरी गेले, VIDEO व्हायरल
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Porsche Crash: “अपघातात दोघांना चिरडून ठार करणाऱ्या मुलावरही आघात झालाय, त्याला..” मुंबई उच्च न्यायालयाचं मत

दुसऱ्या व्हिडीओमध्ये, ती व्यक्ती एका परदेशी महिलेला त्याची पत्नी म्हणून सांगते. तसेच तिच्याबरोबर असलेल्या पुरुषाला आपला मेहुणा म्हणून हाक मारून व्हिडिओ रेकॉर्ड करताना दिसतेय.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटीझन्सनी तीव्र संतप्त व्यक्त केला आहे. तसेच त्या व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान @ThePlacardGuy नावाच्या एकस युजरने त्या व्यक्तीला एक व्हिडिओ शेअर करत लिहिले की, अशा लोकांमुळे परदेशातील पर्यटकांना भारतात वाईट अनुभव येतो. जयपूर पोलिसांनी पर्यटकांना त्रास देणाऱ्या या व्यक्तीला अटक करून अतिथी देवो भवाचा अर्थ शिकवावा.

मद्यधूंद कारचालकाने पोलिसाला नेलं फरफटत, दोघांनी चालत्या गाडीतून मारल्या उड्या, अन् पुढे जे घडलं ते फारच भयानक….; पाहा VIDEO

व्हिडिओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने पुढे लिहिले की, जयपूरमध्ये राहणाऱ्या एका मैत्रिणीने सांगितले की, तिने परदेशी पर्यटकांना त्रास देणाऱ्या या व्यक्तीला अनेक वेळा इतर पर्यटकांनाही त्रास देताना पाहिले आहे. ही व्यक्ती आमेर फोर्टवर टूर गाईड म्हणून असते. ती आमेर आणि जयगडच्या आसपास फिरत राहते. एकदा या फोर्टच्या आत या व्यक्तीला वागणुकीमुळे तरुणांच्या एका गटाने मारहाण केली होती. पण आता त्याला तुरुंगातील उपचाराची गरज आहे. यावर तातडीने कारवाई करावी, असे एका सोशल मीडिया यूजरने लिहिले आहे.

दुसऱ्या एका सोशल मीडिया यूजरने लिहिले की, जर या महिलांना कळले की, ही व्यक्ती त्यांच्याबद्दल कोणत्या गोष्टी बोलत आहे, तर त्यांना काय वाटेल? आणखी एकाने लिहिले की, अशा लोकांमुळे देशाचे नाव कलंकित होते, जयपूर पोलीस त्याला धडा शिकवतील का? शेवटी एकाने लिहिले की, देशाच्या सन्मानाचा आणि पाहुण्यांचा अनादर करणाऱ्यांना माफ करू नये, विलंब न करता कारवाई करावी.