Pahalgam Terror Attack Fact Check Photo : जम्मू व काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. पहलगाममधील बैसरन व्हॅली भागात दुपारच्या सुमारास दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका गटाला लक्ष्य करून बेछूट गोळीबार केला. त्यात २७ जणांचा मृत्यू झाला; तर अनेक जण जखमी झाले. या घटनेनंतर आता सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यात लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेसंबंधित दावा करणारे दोन फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसले. त्यात दहशतवादी हल्ल्यानंतर ठिकठिकाणी मृतदेहांचा खच पडल्याचे दिसतेय. पण खरंच हे फोटो पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे आहेत का याबाबतचे सत्य जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

ट्रेनी या एक्स युजरने त्याच्या प्रोफाइलवर हे फोटो शेअर केले आहेत.

इतर युजर्सदेखील तेच फोटो शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही फोटोंवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून तपास सुरू केला. हे फोटो कोणत्याही मीडिया संस्थेने किंवा वृत्तसंस्थांनी प्रसारित केले नव्हते. फोटोंतील गांभीर्य लक्षात घेत, ते AI इमेज डिटेक्टरद्वारे तपासण्यास सुरुवात केली.

HIVE मॉडरेशनच्या निकालांवरून असे दिसून आले की, फोटो AI-जनरेटेड आहेत.

आणखी एक AI डिटेक्टर, https://wasitai.com/ ने देखील असा निष्कर्ष काढला की, संबंधित फोटो AI-जनरेटेड आहेत.

साईट इंजिनने असाही निष्कर्ष काढला की, हे फोटो एआय जनरेटेड आहेत.


This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष :

व्हायरल होत असलेले फोटो काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणाचे असल्याचा दावा करणारे फोटो एआय जनरेटेड आहेत. व्हायरल झालेले फोटो खोटे आणि बनावट आहेत.