Viral Video : असं म्हणतात भारतात जुगाडची कमतरता नाही. आपल्या देशात एकापेक्षा एक भारी असे भन्नाट जुगाड पाहायला मिळतात. जुन्या किंवा निरुपयोगी वस्तूंपासून नवीन वस्तू बनवणे, याला आपण जुगाड म्हणतो. सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका माणसाने चावीशिवाय स्कुटी सुरू करून दाखवली आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटेल पण हे खरंय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

स्कुटी सुरू करायची असेल तर सर्वात आधी आपल्याला चावी हवी असते. चावीशिवाय आपण स्कुटी सुरू शकत नाही. त्यामुळे आपण नेहमी स्कुटीची चावी हरवू नये, याची काळजी घेतो. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये या माणसाने चक्क चावी न वापरता स्कुटी सुरू आणि बंद करून दाखवली आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना प्रश्न पडला असेल की या माणसाने असा कोणता जुगाड शोधला की ज्यामुळे चावी न वापरता स्कुटी सुरू करता येते? त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.

हेही वाचा : जीवाची पर्वा न करता तरुणीने वाचवला पेटत्या इमारतीमध्ये फसलेल्या कुत्र्याचा जीव, VIDEO पाहून येईल अंगावर काटा

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की या माणसाने स्कुटीमध्ये फिंगर प्रिंट सेंसर लावला आहे ज्यामुळे चावी न वापरता दुचाकीचे इंजिन सुरू होते आणि बंद होते. म्हणजेच तुम्ही चावीशिवाय स्कुटी सुरू करू शकता. फक्त तुमचे एक बोट फिंगर प्रिंट सेंसरवर ठेवा आणि स्कुटी सुरू होईल. जर तुम्हाला स्कुटी बंद करायची असेल तर पुन्हा बोट फिंगर प्रिंट सेंसरवर ठेवा.स्कुटी बंद होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

nitya_tech_world_24 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सना हा अनोखा जुगाड आवडला आहे. ७० हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.