Viral Video : भारत हा जुगाडूंचा देश आहे, असं म्हणतात. अनेक जण नवनवीन जुगाड शोधत असतात. जुन्या वस्तूंपासून नव्या वस्तू तयार करतात. काही जुगाड इतके क्रिएटिव्ह असतात की पाहून कोणीही थक्क होईल. सध्या असाच एक अनोखा जुगाड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला जिन्याखालीच जुगाड करून पार्किंग केलेली दिसेल. हा व्हिडीओ कोणालाही आवडेल.
अनेकांच्या घरी जागा खूप कमी असते. अपुऱ्या जागेमुळे कार कुठे पार्क करावी, हे कळत नाही पण एका माणसाने अनोखा जुगाड करत कार पार्किंग तयार केली आहे. हा जुगाड तुम्हीही वापरू शकता आणि अशीच पार्किंग तयार करू शकता.

कार पार्किंगसाठी केला अनोखा जुगाड

या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका व्यक्तीने कार पार्किंगसाठी जागा नसल्याने अनोखी शक्कल लढवली. घरच्या जिन्याच्या खाली कार पार्किंग तयार केली आहे. तुम्हाला वाटेल जिन्याच्या खाली खूप कमी जागा असते मग अशा ठिकाणी कार पार्किंग कशी बनवली जाणार. त्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल.
या व्हिडीओत या व्यक्तीने कार पार्क करण्यासाठी कारच्या आकाराचाच स्टँड बनवला आहे. त्यानंतर ही व्यक्ती या स्टँडवर कार चढवते आणि त्यानंतर हा स्टँड जिन्याखाली ढकलते. विशेष म्हणजे या जिन्याच्या खाली दरवाजा आहे. त्यामुळे येथे कार पार्क केली, हे कोणाला कळणार सुद्धा नाही. हा व्हिडीओ पाहून अनेक जण अवाक् होतील.

हेही वाचा : तुरुंगात कैद असलेल्या मद्यपीने गायलं सॅड गाणं, पोलिसांना हसू आवरेना; व्हिडीओ होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाहा व्हायरल व्हिडीओ

@Rainmaker1973 या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जिन्याच्या खाली लहान कार पार्क करण्यासाठी अनोखी पार्किंग” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जागेचा योग्य वापर, क्रिएटिव्हीला कोणतीही सीमा नाही” तर एका युजरने लिहिलेय, “हे फक्त भारतात होऊ शकतं” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला ही आयडिया खूप आवडली, धन्यवाद.” अनेक युजर्सना ही भन्नाट ट्रिक आवडली आहे. अनेकांनी व्हिडीओ पाहून कमेंट्मध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.