Shocking Video Viral: एका सेकंदाच्या वेळेने जर एखाद्याचे संपूर्ण आयुष्य वाचू शकते, तर त्याचं प्रत्यंतर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका थरारक व्हिडीओमधून मिळतंय. या व्हिडीओमध्ये एक वयोवृद्ध महिला ज्यांना प्रेमानं ‘काकू’ म्हटलं जातं, मृत्यूच्या तोंडातून अक्षरशः निसटून गेल्या आहेत. हा प्रसंग इतका थरारक आहे की पाहणाऱ्यांचाही श्वास रोखला जातो.
सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून अंगावर अक्षरशः शहारा येतो. एका संकटकाळी शांत वाटणाऱ्या क्षणात असं काही घडतं की, क्षणभर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. एका गल्लीत पावसात हातात छत्री घेऊन सावकाश चालत जाणारी वयोवृद्ध महिला… आणि त्या मागे दडलेला मृत्यू. हा प्रसंग इतका थरारक आहे की तुम्ही शेवटपर्यंत श्वास रोखून धराल. नेमकं काय घडलं त्या काकूंसोबत? आणि काकू त्या जीवघेण्या क्षणातून वाचल्या कशा? सगळी गोष्ट आहे खाली… फक्त एका सेकंदाचं अंतर आणि एक संपूर्ण आयुष्य वाचलेलं.
हा प्रकार एका अरुंद गल्लीतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. गल्लीत पावसाचं पाणी साचलेलं, एका बाजूला घरं आणि दुसऱ्या बाजूला एक जुनी, मोडकळीला आलेली भिंत. अशा वातावरणात या काकू आपल्या घराच्या दारासमोर छत्री घेऊन उभ्या असतात. त्या अगदी सावधपणे पावसाच्या पाण्यातून वाट काढत घरात शिरतात… आणि जसं त्या दार ओलांडतात, तसं त्यांच्या मागची संपूर्ण भिंत एका क्षणात कोसळते.
ही भिंत इतक्या वेगात खाली येते की तिचा मलबा, पाणी आणि धुळीचे लोट सगळीकडे पसरतात. जर काकू काही सेकंद मागे राहिल्या असत्या, तर थेट त्या मलब्याखाली गाडल्या गेल्या असत्या. पण, नियतीनं जणू त्यांच्यावर कृपा केली आणि त्या थोडक्यात बचावल्या.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @gharkekalesh या एक्स (पूर्वीचा ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून तो आता लाखो लोकांनी पाहिला आहे. लोकांनी या प्रसंगावर चकित होऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कोणी म्हणालं, “किती नशिबवान महिला आहेत” तर दुसऱ्यानं लिहिलं, “आयुष्याचा काही भरोसा नाहीये, क्षणात काय होईल सांगता येत नाही.” आणखी एकानं थेट लिहिलं, “काकूने तर मृत्यूच्या दारात जाऊन परत यायचा चमत्कारच केला आहे!”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही जाणवेल की, जीवन खरंच क्षणभंगुर आहे.