आजकाल मित्र सहज विचारतात, तु ‘केजीएफ चॅप्टर २’ (KGF-2) पाहिला का? खरंच… ‘रॉकी’ फक्त बॉक्स ऑफिसवरच नाही तर लोकांच्या हृदयावरही धुमाकूळ घालत आहे. म्हणूनच ‘KGF-2’ च्या एका चाहत्याने त्याच्या लग्नाच्या कार्डावर ‘रॉकी भाई’चा एक आयकॉनिक डायलॉग छापला आहे. होय, हा डायलॉग ऐकून तुम्ही नक्कीच सिनेमागृहात शिट्ट्या आणि टाळ्यांचा आवाज ऐकला असेल. आता ही लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

डायलॉगला दिला ट्विस्ट

लग्नपत्रिकेचा हा फोटो ट्विटर यूजर @MISS_BINGG ने शेअर केला आहे. रॉकीचा चित्रपटातील डायलॉग आहे – ‘हिंसा, हिंसा, हिंसा…मला आवडत नाही. मी टाळतो! पण… हिंसाला मी आवडतो, मी टाळू शकत नाही!’ असा हिंदीत हा डायलॉग आहे. फॅनने हा डायलॉग आपल्या लग्नाच्या कार्डवर अनोख्या पद्धतीने छापला आहे. या वेडिंग कार्डमध्ये लग्नाची सर्व माहिती आहे. पण कार्डच्या तळाशी पाहिल्यावर रॉकी भाईचा डायलॉग वेगळ्या पद्धतीने लिहिलेला दिसतो ‘लग्न…लग्न…लग्न. मला ते आवडत नाही, मी टाळतो, पण माझ्या नातेवाईकांना लग्न आवडते. त्यामुळे मी ते टाळू शकत नाही.

(हे ही वाचा: अजगराने अचानक गायीच्या वासरावर केला हल्ला, पाय पकडला आणि…; बघा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(हे ही वाचा: सुंदरबनमधील वाघाचा बोटीतून उडी मारतानाच हा Viral Video एकदा बघाच!)

५ दिवसात २१५ कोटींची कमाई

‘KGF: Chapter 2’ या चित्रपटाने १४ एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या पहिल्या पाच दिवसांत २१५कोटींची कमाई केली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता यश व्यतिरिक्त संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी सारखे दमदार कलाकार आहेत.