How to get rid of mobile addiction from Child: आई-वडिलांसारखेच शिक्षक हे आपल्या गुरुस्थानी असतात. शिक्षक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवतात. काय चूक काय बरोबर हे शिकवण्याबरोबरच आयुष्याची गणितं कशी सोडवायची ते शिकवतात. ज्ञानाचा सागर असलेले आपले शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतात.

शिक्षणाबरोबरच शिक्षकांवर एक मोठी जबाबदारी असते ती म्हणजे त्यांना योग्य ती शिस्त, संस्कार आणि चांगली सवय लावण्याची. आजकाल अनेक लहान मुलं मोबाइलच्या आहारी गेले आहेत. मोबाइलशिवाय ते सुखाचा जेवणाचा घासही घेत नाहीत. सगळ्या गोष्टींसाठी त्यांना मोबाइल हवा असतो. म्हणून आजच्या पिढीतील लहान मुलांना लागलेली ही सवय घालवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी शिक्षकांनी एक आगळा वेगळा प्रयोग करून पाहिला आणि तो यशस्वीही झाला.

व्हायरल व्हिडीओ (Kid Using Phone Solution Viral Video)

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीही तुमच्या लहान मुलाला मोबाईलपासून कायमच दूर ठेवू शकता. या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की शिक्षिका शाळेतील या लहान मुलांना मोबाईल देऊ पाहते आहे पण एकही विद्यार्थी त्या मोबाईलला हात लावत नाहीये. पण हे नेमकं कसं शक्य झालं ते पाहाच…

व्हिडीओमध्ये शिक्षकांनी मिळून एक लहानसा नाटक सादर केलं आहे ज्यामुळे मुलांना चांगलाच धडा मिळाला आहे. व्हिडीओमध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्याची भूमिका बजावताना दिसतेय.

ती शाळेतून येते आणि दप्तर तसंच बाजूला टाकून फोनमध्ये गेम खेळत असते. तिची आई तिच्यासमोर जेवणाचं ताटदेखील ठेवते पण तिचं लक्ष मोबाईलमध्येच असतं. कालांतराने तिच्या या सवयीमुळे तिची दृष्टी जाते आणि डॉक्टर तिला अंधत्व आलं असं सांगतात. आणि तिच्या डोळ्यांना पट्टी लावली जाते. हे संपूर्ण नाटक लहान मुलांसमोर सादर केल्यानंतर मुलांना चांगलीच शिकवण मिळाल्याचं दिसून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @baramati_city_page या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल १ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “बारामतीच्या ज्ञानसागर शाळेतील चिमुकल्यांचा हा व्हिडिओ सध्या देशात वायरल होतोय!” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

युजर्सच्या प्रतिक्रिया (How to Stop Kid using Mobile Phione)

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मस्त…, बारामती देशातील टॉपचा तालुका का आहे..याचे उत्तम उदाहरण आय लव्ह आमची बारामती”, तर दुसऱ्याने “खूप छान कल्पना आहे” अशी कमेंट केली.