एखाद्याशी मैत्री करण्या करतात तुम्ही किंमत मोजली असल्याचे ऐकले आहे का कधी? तुम्ही म्हणाल मैत्री करण्यासाठी कोण पैसे का मोजेल? पण हे जगच काही वेगळे आहे. येथे काहीही होऊ शकते. आत हेच बघा ना तरुणांच्या मनावर राज्य गाजवणारा एक बंगाली रॉकस्टार मैत्री करण्याचे पैसे घेतो. हो, पण त्याच्याविषयी कोणतेही मत बनवण्याआधी तो मैत्रीसाठी पैसे का घेतो हे नक्की जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा : ..म्हणून माजी सैनिकाची लग्न पत्रिका होत आहे व्हायरल

सिलाजीत मजूमदार हे ९० च्या दशकातील प्रसिद्ध रॉकस्टार. या रॉकस्टारने बंगाली तरुणांना आपल्या आवाजाने भुरळ घातली. एखाद्या सेलिब्रिटीला लाभते तसे वलय त्यांनाही लाभले आहे. पण याचा कोणताही गर्व न बाळगता ते या वलयाचा पुरेपुर उपयोग करुन घेतात. या रॉकस्टारशी गट्टी जमवण्यासाठी अनेक जण आपले हात पुढे करतात, अनेकजण त्यांना फेसबुकवर फेंड रिक्वेस्टही पाठवतात. पण, ते मात्र आलेली प्रत्येक फ्रेण्ड रिक्वेस्ट स्वीकारण्यासाठी ५०० रुपये घेतात. दोन महिने झाले की त्या मित्राला ते फेसबुकच्या फ्रेंड लिस्टमधून काढून टाकतात. तुम्हाला अधिक काळ त्यांच्याशी मैत्री ठेवायची असेल तर ठराविक रक्कम त्यांना द्यावी लागते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की हे पैसे घेऊन सिलाजीत नक्की काय करत असतील? सिलाजीत हे पैसे ‘नौका’ या स्वयंसेवी संस्थेला देतात. ही स्वयंसेवी संस्था पश्चिम बंगालमधल्या गरीब मुलांच्या कल्याणासाठी काम करते. सिलाजीतकडून आलेले पैसे हे गरीब मुलांच्या कल्याणासाठी खर्च होतात.

पूर्वी ऑटोग्राफ घेण्यासाठी देखील सिलाजीत १० रुपये घ्यायचे. सिलाजितने आपल्या घराची दारेही आपल्या चाहत्यांसाठी खुली ठेवली आहेत. एका हिंदी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ‘ज्यांना माझ्याकडून शिकण्याची इच्छा आहे, त्याने  बिंधास्त माझ्या घरी यावे’ असेही सिलाजीनते सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkata based rocker charge 500rs to accept friend request on facebook
First published on: 08-12-2016 at 12:14 IST