Viral Video : सोशल मीडियामुळे कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल हे सांगता येत नाही. त्यावर अनेकदा मजेशीर व्हिडींओसोबतच हटके पद्धतीने बनविल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचेही व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात कधी कोणी चिली आइस्क्रीम, तर कोणी मॅगीचे चीज बॉल्स बनवतं. असे एकापेक्षा एक हटके पदार्थ कसे बनवतात हे पाहण्यासाठीदेखील अनेक जण गर्दी करतात; शिवाय काही हौशी खवय्ये हे पदार्थ खाण्याचाही आस्वाद घेतात. दरम्यान, आता अहमदाबादमधील असाच एक हटके पदार्थ खूप चर्चेत आहे; ज्यात चक्क आइस्क्रीमवर चीज टाकल्याचे दिसत आहे.

सध्या हा हटके चीज आइस गोला सोशल मीडियावर खूप चर्चेत असून, अनेक जण त्यावर वेगवेगळ्या मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. हा चर्चेत असणारा व्हिडीओ फूड व्लॉगर सिद्धार्थ शाहने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून, या व्हिडीओसोबत त्याने खाली ‘डिश ऑफ द इयर’ असं लिहिलं आहे. सिद्धार्थनं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आइस्क्रीम विक्रेता एका बर्फाच्या गोळ्यावर आधी निळ्या, पिवळ्या व हिरव्या रंगाचे सिरप टाकतो आणि त्यानंतर त्यावर सफेद रंगाची घट्ट क्रीम टाकतो. मग त्यावर काही ड्राटफ्रुट्स अन् रंगीबेरंगी टुटीफ्रुटी टाकतो. शेवटी त्यावर तो चीजदेखील किसून टाकतो. आजपर्यंत कोणीही आइस्क्रीमवर चीज टाकले नव्हते. त्यामुळे हे आइस्क्रीम खाण्यासाठी अनेकांनी गर्दी केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्याशिवाय या व्हिडीओमध्ये तुम्हाला आइस कुल्फीदेखील बनविल्याचं दिसत आहे.

हेही वाचा: खूपच खतरनाक! चक्क टॉयलेटमधून आला सापाचा आवाज; VIDEO चा शेवट पाहून नेटकऱ्यांना फुटला घाम

पाहा व्हिडीओ:

या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, यावर दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “सर्वांत वाईट कॉम्बो.” तर, दुसऱ्यानं लिहिलंय, “या गुजरातींना प्रत्येक गोष्टीत चीज घालायचा कंटाळा येत नाही का?” तर, आणखी एकानं लिहिलंय, “मी एकदा तरी हे ट्राय करेन.” तसेच आणखी एका व्यक्तीनं म्हटलंय, “या आइस गोलाची टेस्ट कशी लागत असेल?”

दरम्यान, अहमदाबादमध्ये पुन्हा एकदा चीजसोबत हा हटके पदार्थ बनवण्यात आला आहे. याआधीदेखील एका महिलेनं न्यूटेला चीज पास्ता हा नवा पदार्थ बनवला होता. तोदेखील खूप चर्चेत आला होता.