Korean Girls Dance On Madhuri Dixit Song: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या डान्सचे सर्वांनाच वेड लागले आहे. माधुरी दीक्षितने एखाद्या गाण्यावर डान्स केला तर ते गाणे सुपरहिट होतंच. तिचीची डान्स स्टाईल, तिची अदा, तिच्यासारख्या डान्स स्टेप्स क्वचितच कोणी करू शकतील. तुम्ही जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला माधुरी दीक्षितच्या डान्सचे वेड नक्कीच पाहायला मिळेल. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या व्हिडिओमध्ये कोरियन मुले-मुली माधुरी दीक्षितच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोरियाची मुले-मुली रस्त्यावर माधुरी दीक्षितच्या गाण्यावर धमाकेदार डान्स सादर करताना दिसत आहेत. यावेळी त्यांचे एक्सप्रेशन आणि स्टेप्स पाहून कळतं की हे सर्व जण गाणं किती एन्जॉय करत आहे. कोरियन विद्यार्थी ‘हाय रे मेरा घाघरा’ गाण्यावर नाचताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की कोरियन मुलींनी माधुरी दीक्षितच्या डान्स स्टेप्सची पूर्णपणे कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे.

आणखी वाचा : कर्माचे फळ किती लवकर मिळते? गाढवाला लाथा-बुक्क्यांनी मारणाऱ्या व्यक्तीचा हा VIRAL VIDEO तुम्हाला सांगेल

कोरियन मुली या गाण्यावर अगदी बेधुंद होऊन डान्स करताना दिसत आहेत. स्वतः माधुरी दीक्षितने हा डान्स व्हिडीओ पाहिला तर तिलाही या कोरियन मुलींचे नवल वाटेल. संपूर्ण जगाला भारतीय गाण्यांचे वेड लागले आहे, हे हा डान्स व्हिडीओ पाहून कळतं. या व्हिडीओमध्ये तुम्ही कोरियन मुलं मुलींसोबत स्टेप बाय स्टेप मिसळतानाही पाहू शकता. मुली माधुरी दीक्षितच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत तर मुलं रणबीर कपूरच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत.

आणखी वाचा : जगाचा अंत होण्याआधीचे ‘शेवटचे सेल्फीज’ कसे असतील? AI भविष्यवाणीच्या VIRAL VIDEO मधले फोटोज पाहा!

व्हिडीओमध्ये सर्वात लक्षवेधी गोष्ट म्हणजे कोरियन मुला-मुलींनी गाण्यासाठी बॉलीवूडचीच निवड केली नाही तर त्यांचे पोशाख पूर्णपणे भारतीय ठेवले आहेत. त्यांना पाहून ते कोरियन आहेत असं वाटत नाही. मुलींनी घागरा आणि टॉप घातलेले दिसतात, तर मुलांनी कुर्ता पायजमा आणि कोटी घातलेले दिसतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सरकारी शाळेतल्या ‘मॅडम’चा राजेशाही थाट! शिकवण्याऐवजी विद्यार्थ्यांकडूनच करून घेतला मसाज

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : “आयुष्य सोपं नाही…!”, ट्रॅफिकमध्ये भर पावसात भिजत होता स्विगी डिलिव्हरी बॉय, पाहा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ k_drama boy नावाच्या YouTube चॅनलवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ४४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत. अनेक युजर्सनी तर आपल्या बॉलिवूडचं गाणं थेट कोरियापर्यंत पोहोचल्याचं पाहून गर्व भासत असल्याचं मत व्यक्त केलंय.