मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातून आफ्रिकेतून आलेल्या मादी चित्ता गामिनीने ५ नव्हे तर तब्बल ६ पिलांना जन्म दिला आहे. १० मार्च रोजी पिलांची संख्या ५ असल्याचे सांगण्यात आली होती. पण केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज पुन्हा पिलांचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पिलांची संख्या ६ असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे ६ पिलांना जन्म देत मादी चित्ता गामिनीच्या नावावर आता नवा वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी एक्सवर (ट्विटर) व्हिडीओ, फोटो शेअर करत लिहिले की, खूप आनंद झाला, पाच नाही तर सहा पिल्लं आहेत.

Virat Kohli's reaction on strike rate
विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन टीका करणाऱ्यांना फटकारले; म्हणाला, ‘जे लोक दुसऱ्यावर टीका करतात त्यांनी स्वत:…’
MS Dhoni Review System as Umpire Gives Wide Ball in CSK vs LSG match IPL 2024
IPL 2024: धोनी रिव्ह्यू सिस्टीम! पंचांचा निर्णय अन् लगेचच माहीचा रिव्ह्यूसाठी इशारा, पाहा काय घडलं?
LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये

गामिनीने पाच पिल्लांना जन्म दिल्याच्या बातमीच्या एक आठवड्यानंतर आता तिने सहा पिल्लांना जन्म दिल्याची पुष्टी झाली आहे. अशाप्रकारे पहिल्यांदाच आई झालेली गामिनी सहा पिलांना जन्म देणारी पहिला मादी चित्ता बनली आहे.

भारतात चित्त्यांच्या संवर्धनासाठी प्रोजेक्ट चित्ता सुरु करण्यात आला. याअंतर्गत २ टप्प्यांमध्ये नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून २० चित्ते आणण्यात आले, यापैकी ७ चित्त्यांचा मृत्यू झाला, तर १३ पिल्लांचा मृत्यू झाला. यामुळे कुनोमध्ये चित्यांची संख्या आता २७ झाली आहे, त्यात १४ पिल्लांचा समावेश आहे. गामिनीने पिल्लांना जन्म देण्याआधी यावर्षी जानेवारी महिन्यात मादी चित्ता आशाने ३ पिल्लांना जन्म दिला होता.