Woman dance video: सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एका रात्रीमध्ये फेमस करते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो.अनेक असे डान्स व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस येत असतात तर कधी अनेक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या संख्येने नेटकऱ्यांच्या कायम आठवणीत राहत असतात. काही लोक इतक्या विचित्र पद्धतीने डान्स करतात की पाहूनच अजब वाटतं. तर काही अशाप्रकारे डान्स करतात की पाहतच राहावंस वाटतं. जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सध्या सोशल मीडियावर काही महिलांच्या एका ग्रुपचा डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. दरम्यान अशाच काही हौशी महिलांचा गृप डान्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साडी नेसून या महिलांनी चाळीतल्या छोट्याशा जागेत भन्नाट डान्स केला आहे जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

या महिलांनी VIDEO: “तुझ्या नजरेच्या जादूनं अशी मीभुलणार नाय…” चाळीतल्या महिलांच्या कलेला तोड नाही; डान्स पाहून तुम्हीही व्हाल फॅन या गाण्यावर डान्स केला आहे. विशेष म्हणजे त्यांचा डान्स व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच महिला सुंदर हिरव्या रंगाची साडी नेसून डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी अशा स्टेप्स केल्या आहेत की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ mansi.gawande.73 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एकानं यावर प्रतिक्रिया देत म्हंटलंय की, “आवडीला वयाची मर्यादा नसते” अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.