ladies group dance marathi video: सोशल मीडियावर दर सेकंदाला काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. डान्स, जुगाड, भांडण आणि स्टंट यांसारखे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. नुकताच एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. ज्यामध्ये काही महिलांनी भन्नाट डान्स करुन सगळ्यांना घायाळ केलं आहे. व्हिडिओमध्ये महिलांना साडीत अप्रतिम डान्स करताना पाहून यूजर्स थक्क झाले आहे. त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातो आहे.

नुकतीच वटपोर्णिमेचा सण पार पडला. याचपार्श्वभूमीवर एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळी काही महिलांनी वटपोर्णिमेच्या पूजेनंतर चाळीत भन्नाट डान्स केला आहे.या महिलांनी “खली बली खली बली खली बली ” या गाण्यावर डान्स केला आहे. ज्या व्हिडिओची सध्या सर्वत्र मोठी चर्चा होत आहे.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सहा महिला साडी नेसून सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्यांचा डान्स पाहून कोणीही थक्क होईल. त्यांच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून कोणीही थक्क होईल. त्या अप्रतिम असा डान्स करताना दिसत आहे. त्यांचा उत्साह पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. एवढचं नाहीतर या महिलांनी या गाण्यातील एकदम सेम टू सेम स्टेप्स केल्या आहेत. चाळीतल्या मोकळ्या जागेत त्यांनी हा व्हिडिओ शूट केल्याचे दिसत आहे.संसार, कुटुंब, कामाचं टेंशन विसरून महिला स्वत:ची आवड जपताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

मुलांचा अभ्यास, स्वयंपाकाची लगबग, घरातील स्वच्छता, घरातील प्रत्येकाची काळजी, ऑफिसच्या जबाबदाऱ्या, महत्त्वाचे निर्णय घेताना येणारा ताण… एकाच वेळी अनेक पातळ्या यशस्वीपणे सांभाळणाऱ्या महिला प्रगतीमुळे खूश तर आहेत; परंतु या धावपळीत आम्हाला स्वत:साठी वेळच मिळत नाही. दिवसातला थोडासा वेळ मनाला ज्यात आनंद वाटतो, असे काही तरी करण्यासाठी मिळायला हवा, अशी अपेक्षा अनेक महिलांची असते. मात्र हा वेळ आपणच स्वत:साठी काढला पाहिजे, कारण काम, जबाबदाऱ्या आणि कर्तव्य या गोष्टी होत राहतात पण जगण महत्त्वाचं आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या आनंदासाठी वेळ दिलाच पाहिजे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ funny_raada नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “चाळीतल्या बायकांचा नाद वेगळाच असतो” तर आणखी एकानं, ‘आयुष्याचा आनंद घेता आला पाहिजे’