आजच्या युगात ज्या लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळत नाही त्यांच्यासाठी सोशल मीडिया एक वरदान ठरलं आहे. अशा बातम्या आपण रोज ऐकतो आणि बघतो…सोशल मीडियाच्या माध्यमातून कोणी रातोरात कसं प्रसिद्ध झालं याची बरीच उदाहरणं आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो एका लहान मुलाशी संबंधित आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून एक लहान मुलगा आपल्या वडिलांचा व्यवसाय कसा वाढवत आहे, हे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. या लहान मुलाचा हा व्हिडीओ तेलंगणातील आहे. आता या मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

तेलंगणात मोहम्मद इलियास नावाच्या व्यक्तीचे नॉन वेज डिश ‘हलीम’चे दुकान आहे. मात्र या इफ्तारच्या निमित्ताने अपेक्षेप्रमाणे विक्री होत नसल्याने इलियास नाराज झाला. त्यांनी या संदर्भात सांगितले की, “इफ्तारच्या वेळी विक्री न झाल्यामुळे मी अस्वस्थ होतो, पण माझ्या मुलाने माझ्या दुकानाची जाहिरात करण्यासाठी व्हिडीओ बनवताच तो व्हायरल झाला आणि ग्राहकांनी माझ्या दुकानासमोर गर्दी केली. यावेळी सानिया मिर्झाची बहीणही दुकानात दिसली. आम्ही लवकरच वितरण सेवा देखील सुरू करू, असं वडील इलियासने सांगितलं आहे.

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुलाने व्यवसाय कसा वाढवला?
वडिलांच्या ”हलीम”च्या व्यवसायाला गती देण्यासाठी मोहम्मद अदनान नावाच्या मुलाने सोशल मीडियावर त्याची जाहिरात केली, त्यानंतर ग्राहकांची मोठी गर्दी झाली. अदनान म्हणाला, “पूर्वी १० प्लेटही विकणे कठीण होते आणि आता आम्ही १५० प्लेट्स विकतोय…” सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुलगा त्याच्या दुकानातील सर्व वस्तू दाखवताना दिसत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने मुलाचे आणि त्याच्या दुकानाचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट केले आहेत.