Lalbaug cha raja 2025 video viral: गणपती बाप्पा मोरया…, गणेश गणेश मोरया…चा गजर, फटाक्यांची आतषबाजी, दारात सुरेख रांगोळी, सजलेली आरास, विद्युत रोषणाईचा झगमगाट असं वातावरण सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी ‘पंढरी’ मानला जातो. दोन-दोन दिवस रांगेत उभे राहून दर्शन घेणाऱ्या भाविकांची परंपरा यंदाही कायम राहिली असून, लालबागचा राजा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागचा राजाला पाहायला भाविकांची प्रचंड गर्दी आहे. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, भाविक तासनतास रांगेत उभे आहेत. यावेळी लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचाच भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान, लालबागच्या राजाच्या दरबारातील गर्दीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बईच्या लालबाग परिसरातला एक चित्तथरारक असा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये दर्शनासाठी झालेली प्रचंड गर्दी दिसत असून, त्यामुळे लालबागला जाण्याआधी भक्तांनी विचार करावा, असा इशारा नेटकरी देत आहेत. १६ तास १८ तास रांगेत उभे राहून लोक अक्षरश: रस्त्यावरच झोपत आहेत. तर दुसरीकडे लालबागसह अनेक प्रसिद्ध गणपती मंडळांमध्ये व्हीआयपींची रीघ लागली आहे. लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी लोक २० तासांहून अधिक काळ रांगेत वाट पाहत आहेत, परंतु त्यांना दर्शनावेळी जबरदस्तीने त्यांना बाजूला ढकलले जात आहे. लोक रस्त्यावर झोपत असल्यानं भाविकांच्या सुरक्षिततेची आणि गर्दी व्यवस्थापनाची चिंता निर्माण झाली आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ bappachi_ganeshnagari नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरु शेअर करण्यात आला असून हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. गर्दीमुळे ज्यांना उपस्थित राहता येत नाही त्यांच्यासाठी दर्शनाचे थेट प्रक्षेपण विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे, त्यामुळे भाविकांना त्यांच्या घरातून दर्शन घ्या असा सल्ला दिला जातोय.