Lalu Prasad Yadav Video Brushing On Camera: सध्या देशभरात इंडिया विरुद्ध भारत या नावांची चांगलीच चर्चा रंगली आहे. भारताचे राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान अशा विविध अधिकृत लेटर हेड्सवरील इंडिया नाव काढून टाकण्यात आले आहे. मोदींच्या नेतृत्वाखाली असणारे केंद्र सरकार इंडिया या शब्दाचा वापर टाळून आता देशाची ओळख पूर्णपणे भारत अशीच करण्याच्या तयारीत आहेत. अशावेळी, बिहारचे प्रमुख नेते लालू प्रसाद यादव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शर्ट/ कुर्ता न घालता लालू प्रसाद यादव यांनी कॅमेरासमोर दात घासताना दिलेली ही मुलाखत सध्याच्या नावावरून सुरु असणाऱ्या गोंधळातील फरक स्पष्ट करते.
आपण पाहू शकता, या व्हिडिओमध्ये लालू प्रसाद यादव हे दात घासण्यासाठी नीम (कडुलिंबाच्या) डहाळीचा वापर करत आहेत. अजूनही अनेक खेडोपाड्यांमध्ये टूथब्रश ऐवजी अशाप्रकारे कडुलिंबाच्या काडीने दात घासले जातात. यावेळी पत्रकार लालू यांना “तुम्ही नेहमी असेच दात घासता का? तुम्ही कधीच ब्रश वापरलेला नाही का” असे विचारतो. यावर लालू प्रसाद यादव मी नेहमी कडुलिंबाबाच्या काडीनेच दात घासतो असे उत्तर देतात. यावर पुढे पत्रकार विचारतो की, दिल्लीमध्ये असताना अशी कडुलिंबाची काडी मिळायची का?” त्यावर लालू प्रसाद यादव सांगतात की, “नाही दिल्लीत असताना थोडा त्रास व्हायचा कारण दिल्ली तर इंडिया आहे आणि आम्ही इथे भारतात राहतो. इथे आम्हाला हव्या त्या वस्तू मिळतात इंडियामध्ये मात्र मिळत नाही.”
India vs Bharat Video: लालू प्रसाद यादव शर्ट न घालताच कॅमेरासमोर आले आणि…
हे ही वाचा<< ISRO Aditya L1: आदित्य एल १ ने पाठवला पहिला वहिला सेल्फी; सूर्याकडे जाण्याच्या प्रवासातील खास Video पाहा
दरम्यान, हा व्हिडीओ जुना असला तरी आताच्या परिस्थितीला अगदी साजेसा आहे. भारतात विरोधी पक्षांनी एकत्र येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. इंडियन नॅशनल डेव्हल्पमेंटल इन्क्लुजिव्ह अलायन्स (INDIA) या नावाने तयार झालेल्या विरोधी पक्ष आघाडीने एनडीएला आव्हान दिले आहे. विविध राज्यातील विरोधी पक्षांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या आघाडीने लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी देशभरात मोर्चेबांधणी सुरु केली आहे.