Shocking video: हिवाळ्यात बाजारात वेगवेगळी फळं अधिक मिळतात. यातील एक महत्वाचं फळ म्हणजे संत्री. या दिवसात संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. संत्रीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळून येतं. जे शरीराच्या इम्युनिटीसाठी फार गरजेचं असतं. थंडीच्या दिवसात इम्युनिटी वीक झाल्याने सतत सर्दी-खोकला होत राहतो. संत्री इम्यून सिस्टीम मजबूत करतं आणि आजारांपासून बचाव करतं. हिवाळ्यात रोज संत्री खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. त्यामुळे हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात संत्री खाल्ली जाते. असं असलं तरी आता संत्री खाताना सावध व्हा, कारण सध्या असा व्हिडीओ समोर आला आहे की, पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे व्हिडीओ पाहून संत्री घेताना आता तुम्हीही १०० वेळा विचार कराल.

मंडळी तुम्हीही जर बाजारातून संत्री आणून खात असाल तर थांबा त्याआधी हा व्हिडीओ पाहा. कारण आधीसारखं आता फळे आणि भाज्या डोळे झाकून खाऊ अशी परिस्थिती राहिली नाहीये कारण प्रत्येक गोष्टीत आता भेसळ पाहायला मिळते. आता तुम्ही म्हणाल असं झालंय तरी काय? तर सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ताज्या संत्र्यामध्ये आळ्या आढळल्या आहेत. हे संत्री आपण पाहिलं तर अंदाजही येणार नाही की अशाप्रकारच्या आळ्या या संत्र्यामध्ये असू शकतात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला बाजारातून विकत आणलेली संत्री खाण्यासाठी त्याची साल काढत आहे. साल काढल्यानंतर ही संत्री खाणार तेवढ्यात खबरदारी म्हणून तिनं संत्री पूर्ण खोलून पाहिली तर तिला धक्काच बसला कारण वरुन इतक्या ताज्या दिसणाऱ्या संत्रीमध्ये अशाप्रकारचे किडे असतील असं कुणी विचारही केला नसेल. तुम्हीही या व्हिडीओमध्ये पाहू शकता, कशाप्रकारे या आळ्या वळवळत आहेत. आता विचार करा की, याच आळ्या जर पोटात गेल्या तर? नक्कीच आपण आजारी पडू. म्हणूनच संत्री आणल्यानंतर व्यवस्थित बघून खा. बाजारात आधीच मोठ्या प्रमाणावर आपली फसवणूक होत असते. भेसळयुक्त पदार्थ, प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याशिवाय आता आपल्याला पर्याय नाही. कारण- आता सर्वच पदार्थांमध्ये भेसळ केली जाते. त्यामुळेच हल्ली आजारी पडण्याचं प्रमाण वाढलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आता काय जीव घेणार का?” तुम्हीही डुप्लीकेट अमुल बटर खात नाहीये ना? आत्ताच तपासा; VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ jyoti.pandey.9083 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी “हो हे खरं आहे आमच्याबरोबरही असं घडलं” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.