Leopard Viral Video: जंगलातील प्राणी, जसे की वाघ-सिंह यांची दहशत सगळ्यांनाच वाटत असते. जंगलातील कुठल्याही प्राण्यापासून माणसं चार हात लांबच राहतात. पण, बिबट्या हादेखील एक असा प्राणी आहे, ज्याचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना घाम फुटतो. जंगली प्राण्यांची ही भीती अनेकांच्या मनात कायम असते.
आपण अनेकदा असे प्राणी फार फार तर सिनेमांमध्ये पाहतो. पण, विचार करा जर तुमच्यासमोर प्रत्यक्षात अचानक बिबट्या आला तर… अशी परिस्थिती कोणावर ओढावली तर त्या व्यक्तीची स्थिती तिथेच घाबरगुंडीनं अर्धमेल्यासारखी होईल हे नक्कीच. पण, काही जण अशा परिस्थितीतही धीट असतात. सध्या असाच एक भयंकर प्रकार घडलाय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
बिबट्याचा व्हायरल व्हिडीओ (Leopard Attack Video)
बिबट्याचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून थरकाप उडेल. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आपण पाहू शकतो की, रात्रीच्या वेळी रस्त्याच्या एका कोपऱ्याला एक माणूस अंथरूण घालून बसला आहे. तेवढ्यात अचानक एक भलामोठा बिबट्या त्याच्या जवळ जातो. त्याचा वासही घेतो. पण, नशिबाने त्याला काहीही न करता तिथून शांतपणे निघून जातो. हे सगळं होत असताना तो माणूस मनातून खूप घाबरला असला तरी तसाच शांत राहतो, आरडा ओरडा करत नाही. दरम्यान, ही धक्कादायक घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकलेले नाही.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @tracker_with_love या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून याला तब्बल ४ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत. तसंच “यात या माणसाने काय केलं पाहिजे होतं” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तो परत गेला कारण समोरची व्यक्ती शांत होती. तिने काही हालचाल केली नाही. त्यामुळे त्याने माघार घेतली. आपल्या सारखं कोणी तिथे असतं तर आरडाओरडा केला असता आणि त्यामुळे त्याने आपल्यावर हल्ला केला असता”, तर दुसऱ्याने “बिबट्यानेही विचार केला असेल जो आधीच गरिबीने मेला आहे त्याला आणखी कसं मारायचं” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “अशा परिस्थितीत नेहमी शांत राहिले पाहिजे”