Wild Animal Attack Gone Wrong: जंगल हे नेहमीच रहस्यांनी भरलेलं असतं. तिथं कोण कधी कोणावर भारी पडेल, याचा नेम नसतो. जगभरातील जंगलांमध्ये रोज असे काही ना काही घडते की, जे माणसाला आश्चर्यचकित करते. कुणीही समजून घ्यावं, की इथे फक्त ताकदवान नव्हे, तर चपळ, हुशार आणि सावध राहणाराच जिंकतो. सध्या असाच एक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जिथे एक बिबट्या आपल्या चुकांमुळे स्वतःच बळी ठरतो. बिबट्या चालला होता एक सहज शिकार पकडायला… पण पुढच्या काही सेकंदांतच असं काहीतरी घडलं, की ज्यामुळे त्या बिबट्याचा आत्मविश्वास कोलमडून गेला. कारण- व्हिडीओमध्ये जे दिसतं, ते दृश्य डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, असं आहे.
बिबट्या हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. गर्द झाडी असो वा गडद अंधार, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही बिबट्या शिकार करण्याची क्षमता ठेवतो. त्याच्या सामर्थ्याशी स्पर्धा करणं क्वचितच कोणाला शक्य होतं. त्यामुळेच बिबट्या हा अत्यंत चतुर आणि चलाख शिकाऱ्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. पण, या व्हायरल व्हिडीओत एक वेगळंच अनपेक्षित दृश्य पाहायला मिळालं.
व्हिडीओमध्ये एक बिबट्या जंगलात शिकारीच्या शोधात सावधपणे फिरतोय. त्याची नजर एका काळ्याशार प्राण्यावर जाते आणि बिबट्या त्याला, “ही तर एक साधीशी काळी मांजरच आहे”, असे समजतो. बस मग काय, तो न आवाज करता दबकत दबकत पुढे सरकतो आणि त्याच्यावर अचानक जोरात झडप घालतो.
पुढील घटना अंगावर शहारा आणणारी
त्या काळ्या मांजरीसारखा दिसणाऱ्या प्राण्याचा खरा परिचय बिबट्याला त्या क्षणी होतो, जेव्हा त्याला समजते की, ती काळी मांजर नसून, तो एक ब्लॅक पँथर आहे. एकाच क्षणात पँथर जबरदस्त प्रतिकार करीत बिबट्यावर असा काही पलटवार करतो की, बिचारा बिबट्या हादरून जातो. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट भीती आणि पश्चात्ताप दिसून येतो. जणू ब्लॅक पँथर बिबट्याला सांगतोय, “अरे बावळटा, आपण एकाच कुळाचे आहोत; पण तरीसुद्धा तू माझ्या क्षेत्रात घुसायचं धाडस कसं केलंस?”
ब्लॅक पँथरचं ते आक्रमक रूप पाहून बिबट्या क्षणात मागे फिरतो. तो झटकन तिथून पळ काढतो आणि तिथून लांब निघून जातो. या व्हिडीओवर नेटिझन्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्यात. एक युजर म्हणतो, “आपल्याच फॅमिलीवर हल्ला? हे काय भारीपण झालं?” तर दुसरा म्हणतो, “हुशारी कधी कधी भोळेपणात बदलते!”
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहताना लक्षात येतं की, जंगलात तेथील नियम न पाळणे जसे अंगाशी येते, तसेच येथे चुका करणेही फार महागात पडू शकते. एकंदरीत परिस्थिती समजून न घेता, घाई केल्यास, तिथे शिकारीही शिकार होऊ शकतो.