Leopard Viral Video: आईच्या प्रेमाहून जगात काहीच मोठं नाही असं म्हणतात, मग ती आपली आई असो वा एखाद्या प्राण्याची. आपल्या बाळाचं रक्षण करण्यासाठी आई सदैव तत्पर असते. एक क्षण जरी बाळ नजरेआड गेलं तर आईच्या जीवाची ही घालमेल होते ती शब्दात सांगता येणार नाही. असंच एका आईचं बाळ काही दिवसांपासून सज्जनगडावर हरवलं होतं आणि अखेरीस एका मध्यरात्री या माय- लेकाची गाठ झालीच. या भेटीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक बिबट्या आणि तिच्या पिल्लाची भेट पाहायला मिळतेय.

किल्ले सज्जनगडावर रामघळ परिसरात काही युवकांना बिबट्याचा बछडा खेळताना दिसला होता. सुरुवातीला बिबट्या पाहून सर्वांची घाबरगुंडी उडाली मात्र थोड्यावेळाने धीर करून त्यांनी बिबट्याचे फोटो व व्हिडीओ काढले. याबाबत वनधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. हे फोटो व्हायरल झाल्यानंतर त्याच मध्यरात्री बिबट्याची आई तिथे पोहचली व आपल्या तोंडाने बाळाला उचलून ही आई आपल्या लेकाला घेऊन जाताना दिसली.

Viral Video: पर्यटकांसमोर जिराफाने दिला गोंडस बाळाला जन्म; बाळ जन्मतःच धावायलाही शिकलं

भारतीय वन अधिकारी (IFS), परवीन कासवान यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे, व्हिडीओच्या सुरुवातीला बिबट्याची आई तिच्या पिल्लाला तोंडात धरताना दाखवली आहे. यानंतर माता बिबट्या झुडपात फिरताना दिसत आहे. सर्व मांजरीच्या प्रजाती अगदी बिबट्यासुद्धा अशाच प्रकारे त्यांच्या पिल्लांना घेऊन जातात असेही पुढे कासवान यांनी सांगितले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बिबट्याच्या माय-लेकाची भेट

दरम्यान, हा व्हिडीओ शेअर केल्यापासून, व्हिडिओला ४३, ००० पेक्षा जास्त व्ह्यूज आणि २,००० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. आतापर्यंत शंभरहून अधिक युजर्सनी पोस्ट रिट्विट केली आहे.