जंगलाच्या दुनियेत कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. इथे कोण कोणाची कधी शिकार करेल हे सांगणे कठीण आहे. आपण अनेकदा जंगलामधील प्राण्यांच्या लढाईचे व्हिडीओ पाहिले असतीलच. अनेकदा प्राण्यामधील लढाई पाहून थरकाप उडतो. कधी कधी तर शिकार करायला आलेला प्राणीच शिकार बनून जातो. आजकाल असाच एक व्हिडिओ बघायला मिळत आहे. ज्यामध्ये एका भुकेल्या बिबट्याला अजगराला आपली शिकार बनवायची असतानाच, पुढच्याच क्षणी खेळ पूर्णपणे बदलतो.

बिबट्या हा जंगलातील निर्दयी शिकारी असल्याचे सांगितले जाते. एखाद्या प्राण्यामागे पडल्यास त्याला जीवे मारल्याशिवाय तो मागे हटत नाही. पण प्रत्येक वेळी ते बळी पडतातच असे नाही, आता बिबट्याने महाकाय अजगराची शिकार करण्याची चूक कुठे केली फक्त हा व्हिडिओ पहा.

( हे ही वाचा: झोपलेल्या सिंहणीची सिंहाने काढली छेड; मग असं काही घडलं, ज्याने जंगलाचा राजा पूरता हादरला, पहा Video)

येथे व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: आधी आपटून आपटून मारले मग गिळले, मगरीने माशाची केली थरकाप उडवणारी शिकार; पहा VIRAL VIDEO)

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, भुकेलेला बिबट्या अजगराला पाहून त्याची शिकार करण्यासाठी त्याच्या मागे येतो. सुरुवातीला बिबट्या अजगरावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा अजगर चिडतो आणि बिबट्यावर हल्ला करतो. त्यानंतर तो बिबट्याला स्वतःभोवती गुंडाळून घेतो. अजगराच्या तावडीत बिबट्या तडफडत राहतो. पण बिबट्या हार मानत नाही आणि अजगराच्या तावडीतून बाहेर पडण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करत राहतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिथे बिबट्याला अजगराने विळखा घातलेला असतो. तर बिबट्या जीव वाचवण्यासाठी तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. शेवटी कोण हरले आणि कोण जिंकले हे सांगणे फार कठीण आहे. हा व्हिडिओ यूट्यूबवर वर्ल्ड ऑफ वाइल्डलाइफ अँड व्हिलेज नावाच्या अकाऊंटने शेअर केला आहे. या व्हीडिओला शेकडो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.