Harichandrgad viral video: रणरणत्या उन्हाळ्यानंतर पाऊस सुरू झाला की पाणी, हिरवळ आणि डोंगरप्रेमी पर्यटक व ट्रेकर… त्यातही नवाट ट्रेकर मंडळींच्या इच्छा आणि पावलांना धुमारे फुटतात. इतरांचे ट्रेकचे फोटो, धबधब्यातील, जंगलातील, डोंगरातील स्टेटस वा पोस्ट पाहिल्या की येतील तो शनिवार रविवार ट्रेक, अॅडव्हेंचर करावंस वाटतं. अनेक धंदेवाईक मंडळी ही संधी लुटण्यास डोळे झाकून पुढे सरसावतात आणि इथून पुढे खरा धोका सुरू होतो. अनेकांनी या विकेंडला ट्रेंकींगला जाण्याचे प्लॅन केले असतील,मात्र त्या आधी हरिश्चंद्र गाडाच्या पायथ्याचा हा व्हिडीओ पाहा. हा व्हिडीओ बघून तुम्ही विकेंडचा प्लॅन नक्की कॅन्सल कराल.

श्रावणास काही दिवसांत सुरुवात होणार आहे. निसर्गाने हिरवा शालू परिधान केला आहे. गड, किल्ले अन् धबधबे पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. शनिवार, रविवारी मोठ्या संख्येने युवक, युवती पर्यटनासाठी बाहेर पडत आहे. वीकेंड साजरा करणाऱ्यांची मोठी गर्दी वर्षापर्यटनाच्या स्थळी होत आहे. अशातच हरिश्चंद्र गाडाच्या पायथ्याशी चक्क बिबट्यानं दर्शन दिल्यानं सर्वानाच धक्का बसलाय. या भल्यामोठ्या बिबट्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. हा व्हिडीओ पाहून सावध व्हा आणि पर्यटनाचे नियोजन करा…अन्यथा पर्यटनाचा आनंदाऐवजी अडचणींना समोरे जावे लागले.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ट्रेकिंगसाठी आलेली मंडळी रस्त्यावरून जात असताना हरिश्चंद्र गाडाच्या पायथ्याशीच त्यांना झुडपात लपून बसलेला एक बिबट्या दिसला. हा बिबट्या भलामोठा असून एका झडपेतच समोरच्याला संपवण्याती ताकद त्याच्यामध्ये असते. हे पर्यटक गाडीमध्ये असल्यानं बचावले मात्र एखादा बाहेर कुणी त्यावेळी असता तर बिबट्यानं नक्कीच हल्ला केला असता. बिबट्याही या पर्यटकांकडे रागाने पाहताना दिसत आहे.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shiv.gaik01 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून लोक यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

हरिशचंद्र गड

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हरिश्चंद्रगड हा प्राचीन गड असून महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. या गडावरून अनेक किल्ल्यांचे दर्शन होते. हरिश्चंद्रगड समुद्रसपाटीपासून १४२४ मीटर उंचीवर आहे. हरिश्चंद्रगड हा माळशेज घाटात असलेला अजस्र डोंगर आहे. हा गड चढण्यासाठी मध्यम स्वरूपाचा आहे. या गडाजवळ पाचनई, खिरेश्वर हे गाव आहेत.