LIC AAO & AE Recruitment 2025: भारतीय जीवन विमा महामंडळाने मेगाभरतीची घोषणा केली आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO Generalist), असिस्टंट इंजिनीयर, असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO Specialist) ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार एलआयसीच्या अधिकृत वेबसाइट licindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ८४१ पदे भरली जाणार आहेत. त्याची नोंदणी प्रक्रिया १६ ऑगस्ट २०२५ पासून सुरू झाली आहे आणि उमेदवार ८ सप्टेंबर २०२५ पर्यंत अर्ज करू शकतात. पदवीधरांसाठी ही मोठी संधी असून, निवड झालेल्या उमेदवारांना सुमारे १.६९ लाख रुपये पगार मिळेल. पण, अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरतीसंदर्भात सविस्तर माहिती घ्यावी.

रिक्त पदांची संख्या (LIC AAO Vacancy Details)

१) असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO) Generalist – ३५० पदे
२) असिस्टंट इंजिनीयर : – ८१ पदे
३) असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO) Specialist : ४१० पदे

LIC AAO & AE Recruitment 2025
एलआयसी भरती २०२५

शैक्षणिक पात्रता (LIC AAO Notification 2025 Eligibility Criteria)

असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO) Generalist या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.

असिस्टंट इंजिनीयर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेची B.E./B.Tech/ (Civil/(Electrical) पदवी असणे आवश्यक आहे.

असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स (AAO) Specialist पदासाठी अर्ज करणारा उमेदवार CA /ICSI किंवा पदवीधर किंवा LLB असावा.

LIC AAO & AE Recruitment 2025 Details
एलआयसी भरती २०२५

वयोमर्यादा

अर्जदार उमेदवाराचे किमान वय २१ वर्ष आणि कमाल वय ३०-३२ वर्षांदरम्यान असावे, उमेदवाराचे वय १ ऑगस्ट २०२५ च्या आधारावर मोजले जाईल. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत तीन ते पाच वर्षांची सवलत आहे.

अर्ज शुल्क (Application Fee)

१) अनुसूचित जाती/जमाती/दिव्यांग उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ८५ रुपये + व्यवहार शुल्क + जीएसटी आहे.
२) तर इतर श्रेणींतील उमेदवारांसाठी ७०० रुपये + व्यवहार शुल्क + जीएसटी आहे.

निवड प्रक्रिया

प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी होईल. पूर्वपरीक्षेचे गुण अंतिम गुणवत्तेत समाविष्ट नसतील. पण, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीत मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाईल.

कसा कराल अर्ज? (Lic AAO Notification 2025 Apply Online)

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवार स्वतः ऑनलाइन अर्ज करू शकतात. तुमच्या सोईसाठी अर्जाची लिंक आणि स्टेप्स दिल्या आहेत.

१) अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम https://www.licindia.in/ या वेबसाईटवर जावे.
२) होम पेजवर ‘Careers’ सेक्शनमध्ये जा. त्यानंतर LIC AE/AAO भरती 2025 वर क्लिक करा .
३) यानंतर Register online साठी रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड टाका आणि तपशीलवर माहिती भरा.
४) आता application fee online वर क्लिक करा.
५) नंतर Submit the application form क्लिक करून प्रिंटआऊट मिळवा.

महत्वाच्या लिंक्स ( LIC Recruitment 2025 Important Links)

१) अधिकृत वेबसाईटची लिंक
licindia.in

२) भरतीसंदर्भातील अधिकृत जाहिरात लिंक

https://licindia.in/recruitment-of-aao-generalists/-specialists

३) ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाईट लिंक

https://ibpsonline.ibps.in/licjul25