एखादा कर्मचारी वेळेच्या आधीच कार्यालयात येत असेल आणि अतिरिक्त वेळ थांबून काम करत असेल तर असा कर्मचारी कोणत्या वरिष्ठांना नाही आवडणार? असे मेहनती कर्मचारी वरिष्ठांना आणि कंपनीला प्रिय असतात. कामाप्रतीचा त्यांची निष्ठा पाहून वरिष्ठ अशा कर्मचाऱ्यांवर नेहमीच खूश असतात. याउलट जे कर्मचारी नेहमी कामावर उशीरा येतात, लवकर निघतात किंवा मन लावून काम करत नाहीत, त्यांच्याविषयी वरिष्ठांचे मत फारसे चांगले नसते. जगातील जवळपास सर्वच कंपन्यांमध्ये थोड्याफार फरकाने असे चित्र पाहायला मिळतं.

पण तुम्ही कधी अशा निष्ठावान कर्माचाऱ्यांना वेळेच्या आधी कार्यालयात येतात आणि उशीरा थांबातात म्हणून कंपनीबाहेर हाकलल्याचे ऐकले आहे का? नाही ना? मग स्पेनमधली अजब गजब घटना ऐका. वरील दोन कारणांमुळे स्पेनमधल्या लिडल या प्रसिद्ध सुपरमार्केट चेनने मॅनेजरला घरचा रस्ता दाखवला आहे. जीन असं या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने ‘लिडल’विरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. ‘युरो न्यूज’नं दिलेल्या माहितीनुसार जीन हे गेल्या अनेक वर्षांपासून लिडलच्या शाखेत काम करत आहेत.

जाणून घ्या, सेल्फीसाठी टपावर चढणारी ‘ती’ आहे तरी कोण?

ते नेहमीच वेळेच्या आधी शाखेत यायचे आणि जास्तवेळ थांबायचे. इतर कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टीची तजवीज ते आधीच करून ठेवायचे, यामुळे इतर कर्मचाऱ्यांचा वेळ वाचायचा. पण कंपनीने मात्र अशा प्रकारे थांबणं हे नियमांचे उल्लंघन करण्यासारखं आहे असं सांगत त्यांना कामावरून काढून टाकलं आहे. लिडिलमध्ये ओव्हर टाईम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोबदला दिला जात नाही किंवा येथे ओव्हर टाईम हा प्रकारच अस्तित्त्वात नाही पण तरीही जीन थांबतात, ते सुपर मार्केटमध्ये अनेकदा एकटेच असतात अशी क्षुल्लक कारणं सांगत त्यांना कामावरून काढून टाकल्याचं युरो न्यूजनं म्हटलं आहे.

सोशल मीडियावर अफवांची ‘खिचडी’, राष्ट्रीय भोजनाचा दर्जा नाही

जीनने लिडल विरोधात न्यायलयात धाव घेतली आहे. मी गेल्या कित्येक वर्षांपासून असंच काम करत आहे तेव्हा कंपनीने यावर कधीच आक्षेप घेतला नाही. मग आता मी जास्त काम करतो असं कारण पुढे करत कंपनीने का काढून टाकलं? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. दरम्यान जास्त काम करण्यावरून एखाद्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकण्याची किंबहुना ही पहिलीच घटना असल्यानं सोशल मीडियावर याची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे.