Wild Animal Attack Video: सोशल मीडियावर प्राण्याचे वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होताना पाहायला मिळतात. अनेक वेळा प्राण्यांचे शिकार करतानाचे व्हिडीओ व्हायरल होतात. असे व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधतात आणि त्यांच्या पसंतीस उतरतात. तुम्ही पाहिलं असेल की, लहान प्राणी हिंस्र प्राण्यांची शिकार होतात; पण कधी कधी लहान प्राणी मोठ्या आणि क्रूर प्राण्यांची शिकारही करतात. बऱ्याच वेळा एकटा प्राणी दुसऱ्या प्राण्यांच्या कळपात जाण्याचे धाडस करतो. आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
जंगलात नेहमीच एक अनिश्चितता असते. कधी कोणता प्राणी कोणाची शिकार करील, हे सांगता येत नाही. खरं तर जंगलामध्ये थांबला तो संपला, अशी स्थिती असते आणि इथे प्रत्येक जण एकाच वेळी शिकारी अन् शिकारही असतो. त्यामुळे असे व्हिडीओ पाहून अनेकदा थक्क व्हायला होतं. सिंह हा किती खतरनाक प्राणी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात तो मोठमोठ्या हत्तींचीसुद्धा शिकार करण्याचा दम ठेवतो. त्यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा म्हणतात.
सामान्यतः आपण सिंहाला जंगलाचा राजा मानतो आणि त्याचा शिकारी अंदाज पाहून थक्क होतो. सोशल मीडियावरही असेच अनेक व्हिडिओज पाहायला मिळतात, जिथे तो इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतो. मात्र, सध्या एक असा थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जिथे हा जंगलाचा राजा स्वतः संकटात सापडतो आणि थेट भयंकर प्रसंगाला सामोरा जातो. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सिंहानं कोणत्या प्राण्याची नाही, तर एका सिंहाचीच शिकार केल्याचे दिसून आले आहे. नेमकं घडलं काय जाणून घेऊ…
म्हशींच्या झुंडीत अडकला सिंह
व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसते की, एक सिंह गवतामध्ये विश्रांती घेत असतो. त्याच्या आजूबाजूला जंगली म्हशी मोठ्या कळपानं उभ्या असतात. सुरुवातीला त्या सिंहाकडे दुर्लक्ष करतात; पण अचानक एक म्हैस रागाने उसळते आणि ती सिंहावर थेट आक्रमण करते. त्यानंतर दुसरी म्हैस त्या सिंहाला आपल्या टोकदार शिंगांनी उचलून फेकते. काही क्षणांतच तो संपूर्ण कळप सिंहावर हल्ला करू लागतो. या भीषण हल्ल्यामध्ये सिंह गंभीर जखमी होतो. जंगलाचा हा राजा असा एकाकी अवस्थेत असहाय होतो. हा क्षण इतका धक्कादायक आहे की, तो पाहणाऱ्याच्या अंगावर काटा येतो.
येथे पाहा व्हिडीओ
शिकारीचाच शिकार झाला
हा थरारक व्हिडीओ Instagram वरील @brutal_nature_clip या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओवर आतापर्यंत २५ हजारांहून अधिक लाइक्स आले असून, हजारो लोकांनी कमेंट्स करीत भावना व्यक्त केल्या आहेत. कोणी लिहिलं, “आज शिकारीचाच शिकार झाला!”; तर दुसऱ्यानं म्हटलं, “राजा अडचणीत आलाय!” काहींनी तर गमतीनं म्हटलं, “राजानं आज गादीच सोडली!”