जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला म्हंटल जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये सिंह आणि सिंहीण शिकार करताना दिसत आहेत. मात्र, शिकार करताना अचानक सिंह आणि सिंहीण मध्ये भांडण होते आणि याचा फायदा घेऊन शिकार पळून जाते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खरं तर, सिंह आणि सिंहिणींनी मिळून एका रानटी म्हशीची शिकार केली आहे आणि ती खाण्याची तयारी सुरू आहे, पण त्याच दरम्यान सिंह आणि सिंहीणी एकमेकांना भिडतात. मग काय, म्हशीला संधी मिळते आणि ती आरामात उठून तिथून पळून जाते. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की दोन सिंह आणि तीन सिंहींनी मिळून एका मोठ्या म्हशीची शिकार केली आहे आणि सिंहीण ती खाण्याच्या तयारीत आहे, पण अचानक त्यांची एकमेकांशी भांडणे होतात. यानंतर सिंहही त्यांच्या लढाईत सामील होतात. दोघे एकमेकांशी भांडू लागल्यावर म्हशीला पळून जाण्याची संधी मिळते आणि ती उठून आरामात तिथून पळून जाते.

( हे ही वाचा: स्कूल बसमधील विंडो सीटवरुन मुलगा-मुलगीची तुंबळ हाणामारी; दोघांनी लगावली एकमेकांच्या कानशिलात,Video होतोय व्हायरल)

सिंह आणि सिंहीणीच्या लढाईचा म्हशीला कसा फायदा झाला ते एकदा पाहाच

( हे ही वाचा: लग्नातील पाहुण्यांचे कृत्य पाहून अचानक बंद करावा लागला कारंजा; नेमकं काय घडलं पाहा हा Viral Video)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ @OTerrifying नावाच्या आयडीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या ३० सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत २९ लाख वेळा पाहिला गेला आहे, तर ७७ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक देखील केले आहे.