Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी वाघ, सिंह, बिबट्यासुद्धा जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. आता विचार करा जर बिबट्या आणि सिंह समोरा-समोर आले तर काय होईल. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. पण शेवटी कोणी बाजी मारली हे आता तुम्हीच पाहा. या व्हिडिओचा शेवट पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

सिंहाच्या आणि बिबट्याच्या लढाईत कोण जिंकलं?

व्हायरल व्हिडीओत पाहू शकता की,सिंह फक्त झाडावरच चढत नाही, बिबट्याची शिकार करण्यासाठी तो झाडाच्या कमकुवत फांदीवर जातो. अशातच झाडाची फांदी तुटते आणि नंतर जे काही घडलं, ते पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सिंहाचं वजन जवळपास शंभर किलोच्या आसपास असतं आणि बिबट्याचं वजनही ५० किलोपेक्षा कमी नसतं. बिबट्या त्याची शिकार लपवण्यासाठी झाडाला सर्वात सुरक्षीत ठिकाण मानतो. पण शिकारीसाठी तो जंगलाचा राजा सिंहालाही झाडावर चढण्यास भाग पाडतो.हिरव्या झाडाच्या फांदीवर सिंह आणि बिबट्यामध्ये मोठं युद्धच रंगतं. शिकारीच्या या थरारक लढाईत बिबट्या कोणत्याही परिस्थितीत त्याची शिकार सोडायला तयार नसतो.तर सिंह सतत बिबट्यावर दबाव टाकून त्याची शिकार करण्याचा प्रयत्न करतो. सिंह बिबट्याशी दोन हात करता करता झाडाच्या फांदीवर जातो.

सिंहानं पोटाची आग विझवण्यासाठी बिबट्यावर झटप मारली. पण सिंहाचा दुदैव म्हणजे बिबट्या सुद्धा खतरनाक शिकारी आहे. त्यानं मोठ्या हुशारीनं सिंहाचा वार चुकवला.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून हा व्हिडिओ ४६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. बहुतांश नेटकरी हा व्हिडिओ पाहून अवाक् झाले आहेत.