Lion Lioness Fight Video: जंगलात घडलेली ही घटना पाहून तुम्हीही हसू थांबवू शकणार नाही. ‘जंगलचा राजा’ असलेला बब्बर शेर सिंहिणीसमोर कसा फडफडला, हे पाहून सोशल मीडियावर लोक हसून बेजार झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक भन्नाट वाइल्डलाइफ व्हिडीओ धुमाकूळ घालत आहे. ‘राजा’ आणि ‘राणी’ची ही लढाई पाहून नेटकरी सैराट झाले आहेत. या व्हिडीओत जंगलाचा राजा म्हणजे बब्बर शेर, त्याच्या राणीच्या म्हणजेच सिंहिणीच्या तडाख्यांपासून जीव वाचवत धडपडतोय, तेही गिधाडासारखा घाबरत! होय, खरंच. या दृश्याने लाखो लोक हसून लोटपोट झालेत.

जंगलचा राजा सिंहाला सर्वच घाबरतात. मात्र, जेव्हा शिकारीची वेळ येते तेव्हा सिहिंणच भारी पडते. जिथं ‘जंगलचा राजा’ म्हणून बब्बर शेराची दहशत असते, तिथंच आज त्यालाच इतका मार खावा लागला की तो गडबडून रस्त्याच्या गटारात फेकला गेला. ही लढाई कुणासोबत होती माहिती आहे का? कुठला दुसरा प्राणी नाही, तर त्याच घरातली ‘राणी’ एक चिडलेली सिंही‍ण. तिच्या पंज्यांच्या मारामुळे सिंहाच्या चेहऱ्यावर जी भीती उमटलीय, ती पाहून लोक अक्षरशः लोटपोट होतायत. पण ही फक्त सुरुवात आहे… कारण पुढे जे घडलं, ते पाहून तुम्हीही श्वास रोखून बसाल.

व्हिडीओत स्पष्ट दिसतं की, सिंहीण कमालीची चिडलेली आहे आणि सिंहावर अक्षरशः जोरदार पंजा चालवत आहे. एका क्षणी तर ती सिंहाला असा धोबीपछाड टाकते की, तो थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडतो. हे पाहून क्षणभर विश्वास बसणार नाही की हा खरंच जंगलाचा राजा आहे का?

सगळ्यात धमाल क्षण येतो जेव्हा मार खाल्लेला सिंह सिंहिणीकडे एक अश्रूपूर्ण आणि भेदरलेली नजर टाकतो, जणू ‘माफ कर ना’ असं विनवतो. या नजरेनं गाडीमध्ये बसलेले पर्यटकही हसून बेजार होतात. ‘शेर आहे की नवरा?’ असा सवालही अनेकांच्या चेहऱ्यावर झळकतो.

३ जुलै रोजी @AMAZlNGNATURE या एक्स (पूर्वी ट्विटर) हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओला आतापर्यंत तब्बल ९२ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. युजर्स सिंहाच्या अवस्थेला ‘पती-पत्नीचे भांडण’ असे म्हणत मजेशीर कमेंट्स करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एक युजर म्हणतो, “बायकोशी पंगा घेतलास तर असंच होणार!” तर दुसरा म्हणतो, “या सिंहाला आता पुढच्या जन्मीही बायकोचा राग चढलेला आठवेल!”

येथे पाहा व्हिडीओ

सध्या या जंगलातली ‘घरेलू’ भांडणाची क्लिप इंटरनेटवर हसूनहसून पाहिली जातेय. तुम्ही पाहिलात का व्हिडीओ? हा व्हिडीओ मिस करू नका, शेवटपर्यंत पाहा आणि तुम्हीही लोटपोट व्हाल!